आपण सुंदर, आकर्षक दिसावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण सतत वजन वाढत असल्यामुळे आत्मविश्वास कमी होतो. शिवाय वजन वाढत असल्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. वजन जास्त असल्यास थोडं काम केलं तरी थकवा जाणवतो. चालताना किंवा पायऱ्या चढताना श्वास लागणे, स्नायू आणि सांधे दुखणे.. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, अयोग्य आहार हे वजन वाढण्यामागे कारण मानलं जातं, ज्यामुळे शरीरात चरबी वाढू लागते. अशात तुम्हाला देखील फिट राहायचं असेल स्वतःची काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे.
लठ्ठपणा हे अनेक रोगांचं मूळ मानलं जातं जसे की मधुमेह, हृदयाशी संबंधित समस्या, रक्तदाब वाढणे इ. त्यामुळे वाढत्या वजनाकडे दुर्लक्ष करू नका, तर योग्य वेळी त्यावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. सांगायचं झालं तर, अनेकदा योग्य आहार घेऊन देखील वजन वाढतं. ‘ही’ त्यामागची 5 काराणं आहेत.
सुस्त लाईफ स्टाइलमुळे देखील वजन वाढू शकतं. सुस्त लाईफ स्टाइल म्हणजे शारीरिक श्रम कमी करणे. एका जागी बसून ज्या लोकांचं काम असतं. त्यांचं वजन लवकर वाढतं. कायम 7 – 8 तास एकाच जागी काम केल्यामुळे शारीरिक हलचाल होत नाही. त्यामुळे रोज व्यायम करणं गरजेचं असतं. रोज सकाळी किंवा संध्याकाळ व्यायाम, जॉगिंग, चालणे इत्यादी करायला सुरुवात करा. याशिवाय ऑफिस किंवा घरात लिफ्टऐवजी जिने वापरा. दर 1 तासाने किंवा दिवसातून 40 मिनिटांनी काही मिनिटांचा ब्रेक घ्या.
हार्मोनल असंतुलनामुळे देखील वजन वाढू शकतं. थायरॉईडची लेव्हल असंतुलित असल्यास, मेटाबॉलिज्म मंदाऊ शकतो, ज्यामुळे वजन वाढू लागतं. याशिवाय काही वेळा शरीरात इन्सुलिनचा योग्य वापर होत नसेल तर ही साखर फॅटमध्ये बदलते आणि शरीरात साठू लागते. याशिवाय इस्ट्रोजेन हार्मोनच्या असंतुलनामुळेही वजन वाढू शकते.
शारीरिक दृष्ट्या फिट राहण्यासाठी झोप फार गरजेची आहे. शारीरिला आरामाची गरज असते. योग्य झोप घेतल्यानंतर अनेक आजार दूर होतात. योग्य झोपे नसेल तर वजन वाढू शकतं. जेव्हा तुम्हाला योग्य झोप मिळत नाही, तेव्हा हार्मोनल असंतुलन होऊ शकते आणि त्याचा तुमच्या दैनंदिन दिनचर्येवरही परिणाम होतो, ज्यामुळे मेटाबॉलिज्म मंदावण्यास सुरुवात होते आणि शरीराचे वजन वाढू शकते. फिट राहण्यासाठी योग्य वेळेत झोपणं गरजेचं आहे आणि 7 ते 8 तासांची झोप होणं फार गरजेचं आहे.
काही औषधांमुळे देखील वजन वाढू शकतं. काही आजार असेल आणि तुम्ही औषधं घेत असाल तरी वजन वाढतं. यावर डॉक्टरांचा सल्ला फार महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य आहार आणि झोप घ्या आणि स्वतःला फिट ठेवा.
काही लोकांमध्ये वजन वाढण्याचे कारण अनुवांशिक असते, म्हणजेच आई-वडील किंवा कुटुंबात कोणी जाड असेल, वजन वाढू शकतं. अशा लोकांनी खाण्या-पिण्यापासून ते रोजच्या व्यायामापर्यंत नेहमीच विशेष काळजी घ्यावी.