लेखणी बुलंद टीम:
धूमधडाक्यात सुरु झालेल्या बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझन अखेर संपला आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएंसर सूरज चव्हाणने बिग बॉस मराठी 5 च्या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. सूरज चव्हाण विजयी झाल्यानंतर प्रेक्षक आणि सेलिब्रिटींसह राजकीय नेत्यांनी देखील त्याचं कौतुक केलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीवर सूरजचं अभिनंदन केलं आहे. अजित पवारांनी सूरजसाठी खास पोस्ट लिहिली आहे.
सूरज चव्हाणसाठी अजितदादांची खास पोस्ट
अजित पवार यांनी आधीचं ट्वीटर म्हणजेच एक्स मीडियावर पोस्ट करत लिहिलं आहे की, आमच्या बारामतीचा सुपुत्र सुरज चव्हाण बिग बॉस मराठीचा विजेता ठरला आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करत सूरजनं हे यशोशिखर गाठलं आहे. सुरज आपल्या मेहनतीच्या आणि प्रतिभेच्या जोरावर महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला. त्याच्या यशामुळे बारामतीचाच नव्हे तर, संपूर्ण महाराष्ट्राचा अभिमान वाढला आहे. सुरजला उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा!
अजित पवार यांची ट्वीटर पोस्ट:
आमच्या बारामतीचा सुपुत्र सुरज चव्हाण बिग बॉस मराठीचा विजेता ठरला आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करत सुरजनं हे यशोशिखर गाठलं आहे. सुरज आपल्या मेहनतीच्या आणि प्रतिभेच्या जोरावर महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला. त्याच्या यशामुळे बारामतीचाच नव्हे तर, संपूर्ण महाराष्ट्राचा… pic.twitter.com/HqX8atrEYV
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) October 6, 2024