मुंबईतील मालाड येथे एका घरातून नोकराने तब्बल 15.30 लाख रुपयांचे सोने आणि चांदीची चोरी केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. चोरीच्या घटनेनंतर घाबरलेल्या मालकाने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुध्दात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी सद्या फरार आहे अशी माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नितीश कुमार असं नोकराचे नाव आहे. तो मूळचा बिहार येथील रहिवासी आहे. तर व्यापारी मनन कलम पोदार असं मालकाचे नाव आहे. जुलै 2023 पासून नितीश कुमार मनन पोदार यांच्याकडे कामाला आहे. मात्र, नितीशने नोव्हेंबर 2023 ला अचानक न सांगता कामावरून निघून गेला. नितीशच्या जाण्यानंतर पोदार यांनी दुसरा नोकर ठेवला. काही महिन्यानंतर नितीश कुमार अनपेक्षितपणे घरी परतला.
पुन्हा काम करण्याची इच्छा व्यक्त केली. पोदार यांनी ते मान्य केले आणि नितेशने पुन्हा काम सुरु केले. पुन्हा एका महिन्यानंतर नितेश घरातून पळून गेला. मालकाने त्याच्याशी संपर्क साधण्याचा भरपूर प्रयत्न केला, मात्र त्याने प्रतिसाद दिला नाही. दरम्यान, मननने त्याच्या घरचे लॉकर तपासले. लॉकरमधील रोक रक्कम, 15.30 लाख रुपयाचे सोने आणि चांदीचे दागिने चोरी झाल्याचे निर्देशात आले. या घटनेनंतर मालकाने फरार झालेल्या नितेशवर संशय घेत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीता शोध सुरु केला असून फोन ट्रॅक केले आहे.