बिग बॉसच्या घरात एकूण 16 जणांनी प्रवेश केला होता. त्यापैकी आता टॉप 6 स्पर्धकांनी ग्रँड फिनालेमध्ये एन्ट्री केलीये. याच स्पर्धकांची भेट घेण्यासाठी बिग बॉसच्या घरातून बाहेर पडलेले सदस्य घरात पोहचले. यावेळी या स्पर्धकांची भेट घेऊन प्रत्येकालाच आनंद झाला. 100 दिवसांचा खेळ 70 दिवसांतच आटोपल्यानंतर आता बिग बॉसचा पाचवा सीझन प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
सगळे स्पर्धक आले पण आर्या कुठेय?
बिग बॉसच्या टॉप 6 स्पर्धकांची भेट घेण्यासाठी इतर सर्व स्पर्धक जरी असले तरीही त्यांच्यामध्ये आर्या जाधव कुठेच दिसली नाही. निक्कीच्या कानशिलात लगावली त्यामुळे आर्याला बिग बॉसच्या घरातून हकलून देण्यात आलं होतं. कारण बिग बॉसच्या घरात हिंसा करु नये हा बिग बॉसचा मूलभूत नियम आहे. पण आर्याने निक्कीच्या कानशिलात लगावून याच नियमांचं उल्लंघन केलं. त्यामुळे बिग बॉसच्या घरातून तिला निष्कासित करण्यात आलं. त्यामुळे जेव्हा सगळे स्पर्धक पुन्हा घरात त्यामध्ये आर्या दिसली नाही यावरुन प्रेक्षकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
पुरुषोत्तम दादा पाटील, योगिता चव्हाण, निखिल दामले, इरिना रुडाकोव्हा, घन:श्याम दरवडे, वैभव चव्हाण, पंढरीनाथ कांबळे, वर्षा उसगांवकर, अरबाज पटेल आणि वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतलेल्या संग्रामनेही बिग बॉसच्या स्पर्धकांची भेट घेण्यासाठी घरात प्रवेश केला. पण या स्पर्धकांमध्ये कुठेही आर्या दिसली नाही. त्यामुळे आर्याला का बोलावलं नाही, असा सवाल प्रेक्षक उपस्थित करत आहेत.
प्रेक्षकांनी उपस्थित केले प्रश्न
दरम्यान बिग बॉसकडून या रियुनिअनचा प्रोमो नुकताच शेअर करण्यात आलाय. यावर एका युजरने कमेंट करत म्हटलं की, आर्या कुठे आहे? दुसऱ्या एका युजरने कमेंट करत म्हटलं की, आर्याने येऊन आणखी एक कानाखाली निक्कीला लगावली पाहिजे. आणखी एका युजरने कमेंट करत म्हटलं की, आर्याला का बोलावलं नाही, बिग बॉस तुमचे नियम जरा बदला…