“रंग बदलणाऱ्या सरड्यालाही लाज वाटेल असं विशाल पाटील जिल्ह्यात काम करतोय”- संजयकाका पाटील

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

भाजपचे माजी खासदार संजयकाका पाटील यांनी खासदार विशाल पाटील यांच्यावर जहरी टीका केल्याचे पाहायला मिळाले आहे. रंग बदलणाऱ्या सरड्याला देखील लाजवेल,असं काम विशाल पाटील करतोय, अशा शब्दात संजयकाका पाटलांनी यांनी विशाल पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तसेच जिल्ह्यातल्या मतदारसंघात भांडण लावण्याचे काम आणि दुसऱ्याच्या व्यासपीठावर जाऊन बेताल भाषण विशाल पाटील यांच्याकडून करण्यात येत आहेत, मात्र यापुढे विशाल पाटलांनी कोणतंही बेताल वक्तव्य करणं थांबवलं नाही तर त्याचे राजकीय आणि सगळे परिणाम त्यांना भोगावे लागतील, असा इशारा देखील माजी खासदार संजयकाका पाटील यांनी दिला आहे. तर संजयकाका पाटील हे लोकसभेला पराभुत झाल्याने वैफल्यग्रस्त झाले असून आता विधानसभेनंतर संजयकाका पाटील नगरपंचायतला उभे राहतील की काय? अशी परस्थिती झाल्याची टीका विशाल पाटील यांनी केली होती, यावरुन संजयकाका पाटील यांनी विशाल पाटलांवर जहरी टीका करत टोकाचा इशारा दिला आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *