थायलंडमध्ये 44 मुलांना घेऊन जाणाऱ्या बसला आग (Thailand Bus Fire) लागल्याने 25 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती एएफपी या वृत्तसंस्थेने दिली आहे. थायलंडमधील खु खोत येथील झीर रंगसिट शॉपिंग मॉलजवळ फाहोन योथिन रोडवर स्कूल बसला आग लागली. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, थायलंड नेशन, उथाई थानी येथील शाळेतील 44 विद्यार्थी आणि शिक्षकांना घेऊन ही बस प्रेक्षणीय स्थळांच्या सहलीसाठी अयुथयाकडे जात असताना तिचा पुढचा एक टायर फुटला. यामुळे वाहनाचे नियंत्रण सुटले आणि बस धातूच्या खांबाला धडकली. यामुळे बसला आग लागली. स्थानिक वेळेनुसार दुपारी 12.30 च्या सुमारास हा अपघात झाला.