आजकल बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांचे वजन वाढत आहे. त्यामुळे फिगर चांगली व्हावी म्हणून अनेकजण फिटनेस सेंटरमध्ये घाम गाळत आहेत. परंतू कार्यालयातील बैठे काम आणि फास्टफूडचा वापर यामुळे वजनवाढ आणि बेढब शरीर ही आजकाल सर्वसामान्य समस्या झाली आहे. लठ्ठपणा ही जगभरातील समस्या बनली असून त्यामुळे अनेक आजार शरीरात घर करुन राहीले आहेत. काही वनस्पती देखील वजन कमी करण्यास मदत करीत असतात..त्या कोणत्या ते पाहूयात…
जगभरातील लठ्ठपणामुळे जागतिक आरोग्य संघटनेने चिंता व्यक्त केली आहे. अनेकांना बदलत्या जीवनशैलीमुळे व्यायामासाठी वेळ काढता येणे अशक्य झाले आहे. त्यांच्यासाठी या सहा वनस्पती कामी येणाऱ्या आहेत.
त्रिफळा –
त्रिफळा हे नावावरुनच तीन फळांचे मिश्रण असते. यात आमलकी, बिभीतकी आणि हरितकी या फळाचे मिश्रण असते. त्रिफळा आरोग्यासाठी खूपच गुणकारी आहे. याला पचन समस्येसाठी वापरले जाते. यामुळे पचनआणि एलिमिनेशन यात सुधारणा होऊन वजन घटविण्यास मदत मिळते.
बडीशेफ –
बडीशेप आपण जेवणानंतर माऊथफ्रेशनर म्हणून वापरत असतो. बडीशेफ ही वजन घटविण्यासाठी देखील फायदेशीर आहे.यात विरघळणारे फायबर आढळते. त्यामुळे आपल्याला बराच काळ पोट भरल्यासारखे वाटते. यामुळे भूक कमी होते. आणि पचन यंत्रणेत सुधारणार होते.त्यामुळे बडीशेफ खाण्याने वजन कमी होण्यास मदत मिळते.
दालचिनी –
दालचिनी ही मसाल्यात वापरली जाते. प्रत्येक भारतीय घरात दालचिनी असते.यात थर्मोजेनिक गुणधर्म असतात. जे मेटाबॉलीजम वाढवितात. तसेच चरबी जाळण्यास मदत करतात.
हळद –
हळदीत अनेक औषधी गुणधर्म आहे.अनेक भारतीय पदार्थांत हळद वापरली जाते. यातील एक्टीव्ह करक्यूमिनमध्ये एण्टी – इफ्लेमेटरी गुण आढळतात. जे चरबी जमा होण्यास रोखतात.
मेथीदाणे –
मेथीदाणे देखील वजन कमी करण्यासाठी वापरतात. यात देखील मोठ्या प्रमाणावर फायबर असते.त्यामुळे ते आपल्याला खूप काळ भूक लागू देत नाहीत. तसेच मेथीदाण्यांचा डाएटमध्ये समावेश केल्याने ब्लड शुगर लेव्हल देखील कंट्रोलमध्ये राहाते.
( सावधान : ही माहिती सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहीतीसाठी आपल्या फॅमिली डॉक्टरांशी संपर्क साधावा )