बिग बॉस मराठी 5 च्या घरात Nikki Tamboli ने Ticket to Finale जिंकत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. सूरज चव्हाण विरूद्ध निक्की तांबोळी मध्ये रंगलेल्या टास्क मध्ये विजय मिळवत आता निक्कीने अंतिम फेरी गाठली आहे. बिग बॉस मराठी 5 चा अंतिम सोहळा 6 ऑक्टोबरला रंगणार आहे. यंदाच्या सीझन मध्ये 100 दिवसांचा खेळ 70 दिवस करण्यात आला आहे.