500च्या नोटांवर महात्मा गांधी यांच्याऐवजी अभिनेता अनुपम खेर यांचा फोटो,काय आहे नेमक प्रकरण?

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

सध्या टेक्नॉलॉजीचं जग भलतचं विस्तारलंय . या युगात काहीही होऊ शकतं, AI आल्यापासून तर गोष्टी आणखीनच बिघडत आहेत. बऱ्याच सेलिब्रिटींचे डीपफेक व्हिडीओ समोर आले, त्याने गदारोळ माजला. त्यातच आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आल्याने सगळेच चक्रावले आहेत. त्यामध्ये 500 रुपयांच्या नोटेवर चक्क अभिनेते अनुपम खेर यांचा फोटो छापण्यात आला आहे. खेर यांनीच त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरही हा व्हिडीओ शेअर करत आश्चर्य व्यक्त केलं आहे. “आता बोला. 500 रुपयांच्या नोटेवर गांधीजींच्या फोटोऐवजी माझा फोटो? खरचं काहीही होऊ शकते”. अस लिहीत त्यांनी हा फोटो शेअर केला. मात्र त्यामुळे एकच खळबळ माजली.

काय आहे प्रकरण ?

अहमदाबादच्या सोने-चांदी व्यापाऱ्याला फसवणुकीचा सामना करावा लागला. त्याच्याकडून पोलिसांनी या नोटा जप्त केल्या आहेत. त्या नोतांवर महात्मा गांधी यांच्या ऐवजी अनुपम खेर यांचा फोटो होता तर बँकेचं नाव RBI होतं, पण त्याचा फुलफॉर्म ‘RESOLE BANK OF INDIA’ असा लिहीण्यात आला होता. व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या त्या नोटांचा आकार, रंग आणि डिझाईन अगदी खऱ्या नोटांप्रमाणेच आहे. अगदी खऱ्या नोटांप्रमाणे दिसणाऱ्या नोटांचा हा फोटो सोशल मीडियावरही खूप व्हायरल झाला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोने-चांदी व्यावसायिक मेहुल ठक्कर यांना 23 सप्टेंबर रोजी त्यांच्या ओळखीच्या लक्ष्मी ज्वेलर्सच्या व्यवस्थापकाचा फोन आला होता. त्याने विचारले होते की, त्याला 2 किलो 100 ग्रॅम सोने घ्यायचे आहे, त्याची किंमत काय आहे? मेहुल हा लक्ष्मी ज्वेलर्ससोबत 15 वर्षांहून अधिक काळ व्यवसाय करत आहे.त्यामुळे त्याने त्याच्यावर विश्वास ठेवला आणइ 1.60 कोटींमध्ये करार केला, दुसऱ्या दिवशी सोनं पाठवायचं वचन दिलं.

दुसऱ्या दिवशी म्हणजेच 24 सप्टेंबरला लक्ष्मी ज्वेलर्सच्या व्यवस्थापकाने मेहुलला फोन केला आणि सांगितले की, एका पार्टीला सोन्याची तात्काळ गरज आहे आणि आरटीजीएस काम करत नाही, म्हणून तो सोन्याच्या बदल्यात सिक्योरिटी अमाऊंट आणि त्यानंतर पैसे पाठवले जातील. सोने खरेदी करणारे सीजी रोडवरील अंगडिया फर्ममध्ये असतील आणि तेथेच व्यवहार करतील, असेही सांगण्यात आले.

सोनं तर दिलं पण

त्यानंतर व्यापारी मेहुलने तात्काळ आपल्या कर्मचाऱ्यांपैकी एकाला 2 किलो 100 ग्रॅम सोने घेऊन सीजी रोडवर पाठवले. तेथे तीन लोक उपस्थित होते, त्यापैकी एकाकडे रोख मोजण्याचे मशीन होते. दुसरी व्यक्ती सरदारजींच्या गेटअपमध्ये होती आणि तिसरी व्यक्ती फर्मच्या बाहेर बसली होती. सोने खरेदी करणाऱ्या दोघांनी सेक्युरिटी डिपॉझिट म्हणून 1.30 टी रुपयांच्या नोटा ठेवल्या आणि सोने देण्यास सांगितले. उर्वरित 30 लाख रुपये दुसऱ्या कार्यालयातून आणले जातील, असे सांगितले. मात्र सोनं दिल्यानंतर मेहुलच्या कर्मचाऱ्यांनी नोटा चेक केल्या असता त्या बनावट असल्याचं आढळलं.

हैराण करणारी गोष्ट म्हणजे त्या नोटांवर महात्मा गांधी यांच्या ऐवजी अनुपम खेर यांचा फोटो होता आणि RBI म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ऐवजी ‘RESOLE BANK OF INDIA’ असे लिहिले होते.

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मेहुल तिथे पोहोचले आणि त्यांनी आसपासच्या दुकानात चौकशी केली. तेव्हा तिकडे कोणतीही अंगडिया फर्मच नाही, असे यांना समजले. दोन दिवसांपूर्वीच कोणीतरी तिकडे काम सुरू केले होते.

त्यानंतर मेहुल यांनी लक्ष्मी ज्वेलर्समधून फोन केला, त्या व्यक्तीशी संपर्क साधला असता, तो नंबरही बंद असल्याचे आढळले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मेहुलने पोलिसांत धाव घेतली.

आश्चर्याची बाब म्हणजे नोटा मोजण्याचे यंत्र घेऊन उभा असलेला माणूसही ते मशीन देण्यासाठी आला होता आणि त्या दोन गुंडांना ओळखत नव्हता. अखेर पोलिसांनी जवळील सीसीटीव्ही तपासण्यास सुरुवात केली आणि आरोपींचा शोध घेण्यासाठी एक टीम तयार केली. सराफा व्यावसायिकाची फसवणूक करण्यासाठी दोघांनी बनावट अंगडिया फर्म तयार केली आणि त्याला बनावट नोटा देऊन 2 किलो 100 ग्रॅम सोने लंपास केले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *