विष पिऊन एकाच कुटुंबातील पाच जणांची आत्महत्या

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

 

मिळालेल्या माहितीनुसार देशाची राजधानी दिल्लीतून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. दिल्लीतील वसंत परिसरात एकाच कुटुंबातील पाच जणांनी आत्महत्या केली आहे. ही घटना रंगपुरी गावातली आहे. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहे.

दिल्लीतील वसंत कुंज परिसरातील रंगपुरी गावात एकाच कुटुंबातील पाच जणांनी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी 10.18 वाजता शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून फ्लॅटचे कुलूप तोडून मृतदेह बाहेर काढला. घरातून प्रचंड वास येत असल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले. दरवाजा तोडून पोलिसांनी घरात प्रवेश केला. तर आतमध्ये पाच जणांचे मृतदेह आढळले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिरालाल हा वसंत कुंज येथील स्पायनल इंज्युरी हॉस्पिटलमध्ये कामाला होते. हीरा लाल वय 50 हे आपल्या कुटुंबासह रंगपुरी गावात भाड्याच्या घरात राहत होते. हीरा लाल यांच्या पत्नीचे निधन झाले होते. नीतू, निशी, नीरू आणि निधी या मुली कुटुंबात त्यांच्यासोबत राहत होत्या. अपंगत्वामुळे चारही मुलींना चालता येत नव्हते. मुलांची काळजी घेण्याची जबाबदारी त्याच्यावर होती. तसेच यामुळे त्यांनी हे पाऊल उचलेले असावे अशी माहिती समोर येत आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *