अक्षय शिंदेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी ‘या’ तीन शहरांमधील स्मशानभूमीमध्ये चाचपणी सुरू

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

 

 पोलिसांच्या गोळीबारात ठार झालेला बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे (Akshay Shinde) याचा मृतदेह दफन करून त्याचा अंत्यविधी व्हावा यासाठी प्रशासनाकडून योग्य ती जागाच उपलब्ध केली जात नसल्याने अक्षयचे वडील अण्णा शिंदे यांना शुक्रवारी तातडीने उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली. यानंतर अक्षय शिंदेचा मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत राज्यसरकारने गुरूवारी उच्च न्यायालयात हमी दिली होती. यानंतर आता महत्वाची माहिती समोर आली आहे.

अक्षय शिंदेच्या (Akshay Shinde) मृतदेहावर अंत्यसंस्कारासाठी ठाणे पोलिसांनी बदलापूर, अंबरनाथ आणि ठाण्यातील स्मशानभूमींमध्ये चाचपणी सुरू केली आहे. पोलीस प्रशासनाकडून स्मशानभूमित जागा उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच जागा उपलब्ध होताच आज किंवा उद्या सकाळपर्यंत अंत्यसंस्कार केले जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

अंत्यसंस्काराला केवळ जवळच्या नातेवाईकांनीच उपस्थित राहावे-
कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न सरकारने हाताळावा, असे न्यायालयाने म्हटले. अक्षय शिंदेच्या अंत्यसंस्काराला केवळ जवळच्या नातेवाईकांनाच उपस्थित राहण्यास सांगण्यात यावे, अशी विनंती वेणेगावकर यांनी केली. वडिलांच्या वकिलांना कोर्टाने तसे निर्देश दिले. तसेच त्याच्या कुटुंबीयांना विश्वासात घेऊन आणि निवडक कुटुंबीयांच्या उपस्थितीत शांततेत दफनविधी होईल याची खबरदारी घ्या, अशी सूचना देखील सरकारला केली.

मृतदेहची विल्हेवाट लावण्यासाठी कायदा-
दफनभूमी ही शासनाची आहे कोणाच्याही मालकीची नाही. त्यामुळे मृतदेह दफन करण्यासाठी अंबरनाथ येथे जागा देण्यास का नकार दिला, याबाबतीत अक्षय शिंदेचे वडील अण्णा शिंदे यांचे वकील कटारनवरे यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. सरकारी जमीन ही कुठल्याही जातीधर्माची नसून त्या जागेवर अंत्यविधी नाकारणारे लिंगायत समाज आणि गोसावी समाज यांचा दफनभूमीवर मालकी हक्क आहे का, असा सवाल अण्णा शिंदे यांच्या वकिलांनी उपस्थित केला. अक्षयच्या मृतदेहाची अवहेलना होत आहे. मृतदेहची विल्हेवाट लावण्यासाठी कायदा आहे. त्या कायद्यानुसार उच्च न्यायालयामध्ये मृतदेह विल्हेवाट लावण्यासाठी आम्ही धाव घेणार आहोत. त्यानंतरच मृतदेहाची विल्हेवाट कशी करायची, याबाबतीत कोर्टाकडूनच आम्ही परवानगी घेणार असल्याची माहिती याचिकाकर्ते वकील अमित कटारनवरे यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना दिली.

अमित कटारनवरे गुन्हा घडलेल्या ठिकाणांची पाहाणी करणार-
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी याचिकार्त्यांचे वकील अमित कटारनवरे गुन्हा घडलेल्या ठिकाणांची पाहाणी करणार आहेत. पोलिसांकडून तळोजा कारागृहातून अक्षय शिंदेला संध्याकाळी 5.30 वाजता बाहेर काढलं होतं, आणि मुंब्रा बायपास जिथे घटना घडली तिथे संध्याकाळी 6.15 पर्यंत पोहोचले होते. अशात, खरंच तितका वेळ लागला का? सोबतच मुंब्रा बायपास ते कळवा रुग्णालय किती वेळ लागला? यासंदर्भात क्राइम सीन रिक्रिएशन करत नेमकं तथ्य काय? हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. संध्याकाळी 5.30 वाजता तळोजा जेल परिसराजवळ ॲड. कटारनवरे सुरुवात करतील, अशी माहिती मिळत आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *