लेखणी बुलंद टीम:
भारतीय लेखीका सौंदर्या बालसुब्रमणी (Soundarya Balasubramani) यांना लंडन शहरात मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीत त्यांनी एक डोळा जवळपास गमावला आहे. लंडन येथील रस्त्यावर त्यांना अमानुष मारहाण करण्यात आली. त्यांचं नाक फ्रॅक्चर झालं आहे. या घटनेचा अनुभव त्यांनी सोशल मीडियावर सांगितला आहे.
सौंदर्या बालसुब्रमणी काय म्हणाल्या?
‘१८ सप्टेंबरच्या दुपारी मी लंडन येथील रस्त्यावरुन चालले होते. तेवढ्यात एक धिप्पाड माणूस तिथे आला. तो मला म्हणाला तुम्ही मला काही पैसे देऊ शकता का? मी त्याला नकार दिला, तेव्हा त्याने माझ्या चेहऱ्यावर ठोसे मारले. माझं नाक त्याचवेळी फ्रॅक्चर झालं आणि रक्त वाहू लागलं. काही सेकंदांसाठी मला काय घडलं ते कळलंच नाही. मी जेव्हा स्वतःकडे पाहिलं तेव्हा माझा शर्ट रक्ताने माखला होता. तसंच रस्त्यावरही रक्त सांडलं होतं. माझ्या नाकातून रक्त वाहात होतं. मी इतक्या मोठ्या प्रमाणावर रक्त याआधी कधीही पाहिलेलं नाही.’ असं सौंदर्या बालसुब्रमणी म्हणाल्या.
‘मी तातडीने गुडघ्यांवर बसले. मी कसंबसं मागे वळून पाहिलं तर ज्या माणसाने मला ठोसा मारला तो तिथे उभा होता आणि हसत होता. मात्र हा सगळा प्रकार घडल्यानंतर लोकांनी गर्दी केली. त्यानंतर पोलीसही आले. मला रुग्णालयात नेण्यात आलं. माझ्या डोळ्यांना इजा झाली नाही ना हा एकच विचार माझ्या मनात येत होता. मी डोळ्यांबाबत फार चिंता करत होते. मला डॉक्टरांनी सांगितलं की तुमच्या नाकात फ्रॅक्चर्स आहेत पण तुमचे डोळे ठीक आहेत. माझे डोळे ठीक आहेत म्हटल्यावर मी सुटकेचा निश्वास सोडला.
दरन्यान हल्लेखोराला अटक झाली आहे. न्यायालय त्याला शिक्षाही सुनावेल अशी आशा ही सौंदर्या बालसुब्रमणी यांनी व्यक्त केली आहे. हल्ला झाला त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच १९ सप्टेंबरला पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली होती.
घटनेचा अनुभव त्यांनी सोशल मीडियावर केला शेयर:
I was assaulted on the street in broad daylight on my second day in London.
🧵A thread 👇#assault #london #uk pic.twitter.com/478vzrBtHM
— Soundarya Balasubramani💫 (@curiousmaverlck) September 23, 2024