उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) अमेठी येथील घट्टमपूर गावात शुक्रवारी विजेचा धक्का लागून एका 42 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अजक कुमार असं मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेनंतर गावात शोक पसरला आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. राज्यात ठिकठिकाणी पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील अमेठी येथे राहणारे अजक सकाळी शेतात गेले असताना, ही घटना घडली. शेतात शेतीचे काम करत असताना अचानक त्यांचा पाय घसरला आणि विहिरीच्या बाजूला असलेल्या मशीनच्या तारांच्या संपर्कात आला, ज्यामुळे त्यांना विजेचा धक्का लागला. विजेचा धक्का लागल्याने ते गंभीर जखमी झाले.
कुटुंबियांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. मुन्शीगंज पोलिसांनी अजय यांचा मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या घटनेनंतर गावकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.