भंगार गोळा करणाऱ्याने विकत घेतले चक्क 2 आयफोन, पहा व्हायरल व्हिडीओ

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

जगातील सर्वात महागडे फोन विकणारी कंपनी म्हणून ओळख असलेल्या Apple ने नुकतीच बाजारात iPhone 16 ची सिरीझ लॉन्च केली आहे. दरम्यान, सर्वसामान्य घरातील अनेक व्यक्तींचे आयफोन घेण्याच स्वप्न असते परंतु फक्त तुटपुंज्या कमाईमध्ये आयफोन घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही म्हणून अनेक लोक त्यांच्या स्वप्नातला आयफोन विकत घेत नाही. दरम्यान, एका भंगार वाल्याचा व्हिडीओ नुकताच व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये त्याने सांगितल की, फक्त भंगार आणि कचरा विकून त्याने चक्क महागडा 2 आयफोन विकत घेतले आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असुन भंगार वाल्याच्या हातात आयफोन पाहून लोक “कोणतेही काम छोटे नसते” अशा प्रतिक्रिया देत आहेत. “एक सर्व सामान्य व्यक्ती फक्त नोकरीच्या मागे धावतोय परंतु खरे आयुष्य स्वतःचा बिजनेस करणारे जगत आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही”, अशा प्रतिक्रिया लोक व्हिडीओ पाहून देत आहेत.

भंगार वाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक लोक त्याची प्रशंसा करत आहेत. व्हायरल व्हिडीओवर अनेकांनी बिझनेस सुरु करण्याची प्रेरणा मिळाल्याच्या कमेंट केल्या आहेत. दरम्यान,भारतात iPhone 16 Pro ची सुरुवातीची किंमत 1,19,900 रुपये आहे, ज्यामध्ये 128GB स्टोरेज उपलब्ध असेल. iPhone 16 Pro Max ची सुरुवातीची किंमत 1,44,900 रुपये आहे. इतका महागाचा फोन भंगाराच्या व्यवसायावर विकत घेतल्याने अनेक लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत.

भंगारच्या पैशातून घेतले चक्क 2 आयफोन, पाहा व्हिडीओ:

instagram.com/reel/DAVBejqIKHd


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *