धक्कादायक! आटपाडीत जिम चालकाकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार , नागरिकांकडून शहर बंदची हाक

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

 

अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळे सांगली (Sangli Crime) जिल्ह्यातील तालुक्याचे शहर आटपाडी हादरले आहे. संग्राम देशमुख नावाच्या जिम चालक व्यक्तीवर लैंगिक अत्याचाराचा आरोप आहे. धक्कादाय म्हणजे या प्रकरणात सुमित्रा लेंगरे, नावाची एक महिलाही कथितरित्या सहभागी आहे. अत्याचाराचा एक व्हिडिओही चित्रीत करण्यात आला असून, त्यासाठी आरोपीस या महिलेने सहकार्य केल्याची प्राथमिक माहिती आहे. महिला आणि पुरुष अशा दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. अत्याचाराच्या घटनेनंतर शहरात संतापाचे वातावरण आहे. संतप्त नागरिकांनी या घटनेच्या निषेधार्थ बसस्थानक ते पोलीस स्टेशन असा मोर्चा काढला. या वेळी आरोपीला फाशी द्यावी, अशी मागणी करत नागरिकांनी पोलीस स्टेशनसमोरच ठिय्या मांडला. दरम्यान, हे प्रकरण काही दिवासंपूर्वी घडले आहे. मात्र, ते उशीरा उघडकीस आले.

लैंगिक अत्याचाराचे व्हिडिओ चित्रिकरण

आरोपी संग्राम देशमुख आणि सुमित्रा लेंगरे या दोघांना अटक केल्यानंतर न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. आरोपीने अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराचे व्हिडिओ शुटींग केल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. देशमुख हा आटपाडी येथे जिम चालवतो. जिमच्या आडून त्याने अनेक महिला आणि मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची माहिती पुढे येत आहे. त्यामुळे त्याच्या अत्याचारास आणखी किती महिला बळी पडल्या आहेत, याबाबत अद्याप निश्चित आकडा पुढे आला नाही.

नागरिकांकडून शहर बंदची हाक

अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. आरोपी संग्रम देशमुख आणि त्याला सहकार्य करणाऱ्या महिलेवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करत आटपाडीतील संतप्त नागरिकांनी शहर बंदची हाक दिली. आक्रमक नागरिकांपैकी काहींनी तर आरोपीस फाशी देण्यात यावी अशी मागणी केली. हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा अशी मागणी करत ग्रामस्थांनी पोलिसांना एक निवेदनही दिले.

दरम्यान, आरोपीस अटक केली असली तरी, ग्रामस्थांचा संताप पाहता आरोपीच्या कुटुंबीयांना संरक्षण देण्यात यावे. आरोपीचे आणखीही काही अवैध धंदे आहेत का, त्याने आतापर्यंत किती महिलांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्यावर अत्याचार केले आहेत, याची चौकशी करावी अशी मागणी पुढे येत आहे. दुसऱ्या बाजूला आटपाडी तालुक्यात अवैध धंद्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पोलिसांनी या धंद्यांचीही चौकशी करुन कारवाई करावी, अशी मागणी पुढे येत आहे. पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून, तपास सुरु केला आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *