सीमांचल एक्स्प्रेसच्या 2nd एसी कोचमध्ये विना तिकीट प्रवास करणाऱ्या एका महिला प्रवाशाने टीसीला मारहाण केल्याची घटना घडली. दिल्ली ते बिहार प्रवासादरम्यान टीसीने महिला प्रवाशाला तिकीट (Train Ticket) मागितले असता तिने टीसीसोबत हुज्जत घालत प्रचंड गोंधळ केला. प्रवासी महिली पेश्याने वकिल (Lawyer) असल्याने तिनेही कायदेशीर बाजूंचा आधार घेतला. टीसीचे म्हणणे महिला प्रवासी एकत नसल्याने नंतर पोलिसांना या प्रकरणात लक्ष घालावे लागले. परिणामी, आरोप प्रत्यारोप वाढल्याने सहप्रवासीही महिलेवर संतापले. त्यानंतर ट्रेनमधून महिलेला उतरवण्यात आले. त्यानंतर महिलेने टीसीला मारहाण केली. व्हिडीओत दिसत असल्याप्रमाणे महिलेने टीसीचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला.