ठाण्यातील पॉश परिसर लोढा आमरा येथे एका सुरक्षा पर्यवेक्षकाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना सोमवारी घडली आहे. हत्या झाल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. एका निवाशी इमारतीच्या टेरेसवर डोके नसलेले शरिर आढळून आल्याने ही घटना उघडकीस आली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे शहरातील काबुरबावडी येथील कोलशेत रोड परिसरातील लोढा कॉम्प्लेक्समध्ये हा खून झाला. खूनाची माहिती मिळताच, पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक आणि ठाणे गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून त्याला शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. हत्यानंतर लोढा अमारा या पॉश परिसरात रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
हा मृतदेह एका सुरक्षा पर्यवेक्षकांचा असल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. लोढा आमरा येथील इमारतीच्या टेरेसवर डोके नसलेले मृतदेह आढळून आले. पोलिसांनी अज्ञातांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस घटनास्थळी चौकशी तपासणी करत आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी सुरु केली आहे. या हत्येअंतर्गत पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केलेले नाही. या पुढील तपशीलाची प्रतीक्षा आहे.