धक्कादायक! छत्तीसगडमध्ये वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक; खिडक्यांच्या काचा तुटल्या

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोमवारी छत्तीसगडमधील दुर्ग ते आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणमपर्यंत धावणाऱ्या वंदे भारत ट्रेन(Vande Bharat Express)ला हिरवा झेंडा दाखवून तिचे उद्घाटन करणार आहेत. मात्र, त्या आधीच शनिवारी एक्सप्रेसवर दगडफेक झाल्याची घटना घडली(Stone Pelting on Vande Bharat Express) आहे. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी सकाळी विशाखापट्टणमहून परतत असताना बागबहारा रेल्वे स्थानकावर वंदे भारत ट्रेनवर दगडफेक करण्यात आली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सुदैवाने या घटनेत कोणतीही दुखापत झालेली नाही. मात्र ट्रेनच्या तीन डब्यांच्या खिडक्यांचे नुकसान झाले आहे. शिवकुमार बघेल, देवेंद्र कुमार, जीतू पांडे, सोनवाणी आणि अर्जुन यादव अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांनी सी2-10, सी4-1, सी9-78 या ट्रेनच्या तीन डब्यांच्या खिडक्या फोडल्या, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. आरोपींविरुद्ध बागबहारा येथे 1989 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिकची माहिती अशी की, दुर्ग ते विशाखापट्टणम वंदे भारत ट्रेन व्यतिरिक्त, पंतप्रधान मोदी सोमवारी टाटानगर ते पाटणा, नागपूर ते सिकंदराबाद, कोल्हापूर ते पुणे, आग्रा कँट ते बनारस आणि पुणे ते हुबली या मार्गांवरील वंदे भारत ट्रेनलाही हिरवा झेंडा दाखवणार आहेत.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *