लेखणी बुलंद टीम
दिल्लीतह एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. दिल्लीमधील ग्रेटर कैलास येथील एका जिमबाहेर एका व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे दिल्लीत खळबळ उडाली आहे.
दिल्लीत एका जिमबाहेर एका व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याच्या घटनेमागे टोळी युद्धाचा परिणाम असल्याचं बोललं जात आहे. या गोळीबारात मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नादिर शाह असं नाव असल्याचं सांगितलं जात आहे. यामध्ये ज्या व्यक्तीवर गोळीबार झाला त्या व्यक्तीला तब्बल चार ते पाच गोळ्या लागण्याचं सांगितलं जात आहे. या घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.यासंदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
नेमकी घटना काय घडली?
दक्षिण दिल्लीच्या ग्रेटर कैलास या परिसरात एका जिमबाहेर दोन व्यक्ती उभ्या असलेल्या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे. याचवेळी अचानक एक व्यक्ती त्या ठिकाणी येते आणि त्या व्यक्तीवर गोळीबार करते. या गोळीबारात उभा असलेल्या दोन व्यक्तीपैकी एका व्यक्तीला तब्बल चार ते पाच गोळ्या लागतात. यावेळी हल्लेखोर दुचाकीवरून घटनास्थळावरून पसार झाला. तर गोळीबार सुरु असतानाच दुसरी व्यक्ती पळून जाताना दिसत आहे. तर गोळी लागलेला व्यक्ती गंभीर जखमी होतो. त्यानंतर जखमी झालेल्या व्यक्तीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान त्या व्यक्तीचा गुरुवारी मृत्यू झाला.
या घटनेदरम्यान प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यांनुसार, जिमजवळ तब्बल १० राऊंड गोळी झाडल्याचा आवाज झाला होता. दरम्यान, नादिर शाहचा गुन्हेगारी इतिहास असून या हल्ल्याचा परिसरात सुरू असलेल्या टोळीयुद्धाशी संबंध असल्याचा संशय पोलिसांना असल्याचं वृत्तात म्हटलं आहे. या घटनेनंतर लॉरेन्स बिश्नोई टोळीतील गोल्डी ब्रारचा जवळचा गँगस्टर रोहित गोदाराच्या नावाने सोशल मीडियावर दावा करण्यात आल्याचं इंडिया टुडेनी वृत्तात म्हटलं आहे.
पहा व्हिडीओ:
देशाची राजधानी पुन्हा एकदा हादरली आहे. येथील दक्षिण ग्रेटर कैलाश भागात गोळीबार झाला. त्यामध्ये जिमचा संचालकाचा मृत्यू झाला. #Firing #Firingindelhi #viralvideo #Firingongymowner pic.twitter.com/DlnyKPGVRs
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) September 13, 2024