रविवारी म्हणजेच काल दिड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन झाले. मुंबईत तब्बल 62,000 हून अधिक गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आल्याची आकडेवारी समोर आली आहे. मुंबई महापालिकेच्या(BMC) अधिकाऱ्यांनी सोमवारी त्याबाबतची आकडेवरी जाहिर केली. मुंबईतील विविध जलकुंभांमध्ये 62,000 हून अधिक मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. रविवारी दुपारपासूनच घरगुती गणेश मूर्तीच्या विसर्जनाला सुरूवात झाली होती. रविवारी मध्यरात्रीपर्यंत 62,569 मूर्तींचे समुद्र, इतर जलकुंभ आणि कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन करण्यात आले, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) अधिकाऱ्यांनी दिली.
सर्व गणेश मूर्तींचे विसर्जन हे कोणत्याही विघ्नाशिवाय झाले. ‘विसर्जनाच्या वेळी कुठेही कोणतीही अनुचित घटना घडली नाही,’ असे बृहन्मुंबई महानगरपालिकेने सांगितले. रविवारी, 62,197 घरगुती मूर्ती आणि 348 सार्वजनिक (सार्वजनिक) गणपतीच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यातील 29,923 घरगुती मूर्ती आणि 234 सार्वजनिक मंडळांच्या गणेश मूर्तींचे विसर्जन नैसर्गिक कृत्रिम तलावांमध्ये करण्यात आले. 10 दिवसांच्या गणपती उत्सवादरम्यान, दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस आणि शेवटच्या दिवशी (अनंत चतुर्दशी) भक्त देवतेला निरोप देतात.