आपण सुंदर दिसावे असे प्रत्येक स्त्रीला वाटते. पण त्यासाठी नेमके काय करायला हवे हे आपल्याला माहित नसते. त्यातही रोजची धावपळ आणि वेळेचे गणित यामध्ये आपण स्वत:कडे दुर्लक्ष करतो. पण मेकअपच्या काही सोप्या टीप्स वापरल्यास आपल्या सौंदर्यात भर घालण्यासाठी त्याचा नक्कीच फायदा होतो. यातची सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या त्वचेची काळजी घेणे जास्त महत्त्वाचे असते. त्वचा चांगली असेल तर तुमच्या लूकमध्ये निश्चितच भर पडते. एकूणच चांगा मेकअप आणि व्यवस्थित राहील्याने आपल्या आपला आत्मविश्वासही वाढतो. त्यासाठी घाईच्या वेळेत झटपट होतील आणि सोप्या असतील अशा या मेकअप टीप्सचा वापर नक्की करुन पाहा. घरच्याघरी सहज करता येतील अशा असल्याने तुमच्या खिशालाही फारसा भार पडणार नाही.
१. त्वचेतील आर्द्रता टिकून राहील असे पाहा
रात्रीच्या वेळी आपल्या नकळत आपली त्वचा चांगली होत असते. त्यामुळे रात्री झोपताना चेहऱ्याला मॉईश्चरायझर लावून झोपल्यास त्याचा चांगला फायदा होतो. याशिवाय ऑलिव्ह ऑईलही त्वचेची आर्द्रता योग्य ठेवण्यास उपयुक्त असते, त्याचाही वापर करु शकता
२. नखांना पेट्रोलियम जेली लावा
अनेकदा आपल्या हातांची नखे कोरडी पडतात किंवा ती निर्जिव झाल्यासारखी दिसतात. मात्र त्यातील ओलावा आणि चमक टिकवून ठेवायची असले तर नखांच्या मूळांशी पेट्रोलियम जेली लावल्यास त्याचा फायदा होतो.
३. लिप बामचा वापर करा
चेहरा थकल्यासारखा वाटत असेल तर लिप बामचा वापर करा. त्यामुळे चेहऱ्यावरचा थकवा कमी जाणवतो. तसेच हा लिप बाम थोड्या प्रमाणात गालावर लावल्यास तुम्ही नकळत ताजेतवाने वाटता.
४. ब्लो ड्रायर वापरु नका
ब्लो ड्रायरमुळए केसांना प्रमाणापेक्षा जास्त उष्णता मिळते. त्यामुळे केस खराब होण्याची शक्यता असते. ब्लो ड्रायरच्या उष्णतेमुळे केसातील आर्द्रता कमी होऊन केस प्रमाणापेक्षा जास्त कोरडे होतात. त्यामुळे ते तुटण्याचीही शक्यता असते.
५. चेहऱ्याला क्रीम लावा
चेहऱ्यावर ग्लो आणायचा असल्यास बाहेर जाताना चेहऱ्याला हलके क्रीम लावा. आपल्या त्वचेच्या पोतानुसार हे क्रीम कोणते असावे ते प्रत्येकाने ठरवावे. त्यामुळे तुमचा चेहरा लगेचच चांगला दिसण्यास मदत होईल.