Royal Enfield Classic 350 बुलटचे नवीन मॉडेल्स बाजारात विविध रंगातून उपलब्ध

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

बुलेटमध्ये सर्वात लोकप्रिय ब्रँड म्हणजे रॉयल एन्फिल्ड. आता, कंपनीने नवी Royal Enfield Classic 350 वनी बुलेट लाँच केली आहे. कंपनीचं बेस्ट सेलिंग मॉडेल राहिलेल्या क्लॉसिक 350 चं अपडेट मॉडेल आता बाजारात अवतरत आहे. लूक आणि डिझाईनमध्ये बदल करुन कंपनीने नव्याने क्लासिक 350 बुलेट लाँच केली आहे. या नव्या बुलटेच्या किंमतीतही वाढ झाली आहे. आकर्षक लूक आणि दमदार इंजिनसह ही बाईक आता ग्राहकांच्या सेवेत बाजारात आली आहे. या नव्या क्लासिक 350 बाईकची सुरुवात किंमत 1 लाख 99 हजार 500 रुपयांपासून होत आहे. तर, यातील टॉप मॉडेलची किंमत 2,30,000 (एक्स शोरुम चेन्नई) एवढी आहे. म्हणजेच, या किंमतीत सरकारी इतर टॅक्स वाढल्यानंतर ही किंमत 3 लाख रुपयांच्या पुढे जाऊ शकते.

Royal Enfield Classic 350 बुलटचे नवीन मॉडेल्स बाजारात विविध रंगातून उपलब्ध झाले आहेत. नवीन क्लॉसिक 350 7 नव्या व्हेरिएंट कलरमध्ये बाजारात उपलब्ध आहे. ज्यामध्ये, हेरिटेज,हेरिटेज प्रिमियम, सिग्नल, डार्क आणि एमरॉल्ड व्हेरिएंटमध्ये या बाजारात उतरल्या आहेत. एकूण 7 रंगात असून व्हेरिएंट मॉडेलमध्ये 2 कलर आहेत. मद्रास रेड आणि जोधपूर ब्लू या दोन रंगात हे मॉडेल आहे. तर, ब्रांझ कलर हा हेरिटेज प्रिमियम मेडेलियनमध्ये उपलब्ध आहे. तर सिग्नल व्हेरिएंट कमांडो रंगात आहेत. डार्क व्हेरिएंट गन ग्रे (कॉपर हायलाईटसह ग्रे आणि ब्लॅक रंगाची डुअल टोन स्कीम) आणि स्टील्थ ब्लॅक रंगात हे बुलटे मॉडेल ग्राहकांना खरेदी करता येईल. तसेच टॉप-स्पेक मॉडेल एमरॉल्डमध्ये क्रोम आणि कॉपर पिनस्ट्रिपसह रीगल ग्रीन रंगाचाही ऑप्शन आहे.

पॉवर आणि परफॉर्मन्स
रॉयल एनफील्डने या बाईकच्या इंजिन मॅकेनिजममध्ये कुठलाही बदल केला नाही. ही बाईक पहिल्याप्रमाणेच 349 सीसी क्षमतेसह सिंगल सिलेंडर J सीरीज इंजिनसह येत आहे. हे इंजिन 20.2hp ची पॉवर आणि 27 Nm चे टॉर्क जेनरेट करते. ह्या इंजिनला 5 स्पीड गियरबॉक्सला जोडलेला आहे. कंपनीने काही व्हेरिएंटला अलॉय व्हील्स आणि ट्युबलेस टायरसह बाजारात उपलब्ध आहे. ज्यामुळे बुलटेच्या रेट्रो लूकला थोडा मॉडर्न टच देण्यात आला आहे.

जाणून घ्या किंमत किती?
हेरिटेज – 1,99,500 रुपये
हेरिटेज प्रिमियम – 2.04 लाख रुपये
सिग्नल्स 2.16 लाख रुपये
डार्क 2.25 लाख रुपये
क्रोम 2.30 लाख रुपये


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *