खबरदार! पुण्यात छेड काढणाऱ्यांचे बॅनर्स आता भर चौकामध्ये लावले जाणार

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

पुण्यामध्ये सार्वजनिक गणेशोत्सवात सहभागी होण्यासाठी देशा-परदेशातून नागरिक पुण्याला येत असतात. मात्र गर्दीचा फायदा घेऊन अनेक समाजकंटक मुली-बाळी, महिलांची छेडछाड करत असल्याचं समोर येते. मागील काही आठवड्यात राज्याच्या विविध भागातून महिलांवरील अत्याचाराच्या घटना समोर येत असताना आता पोलिस प्रशासन अलर्ट झाले आहे. छेड काढणाऱ्यांचे बॅनर्स आता भर चौकामध्ये लावले जाणार असल्याचं पुणे पोलिस कमिशनर अमितेश कुमार यांनी म्हटलं आहे.

रोडरोमियोंना अद्दल घडवण्यासाठी आता आरोपींच्या फोटोंचे बॅनर्स भर चौकात लावले जाणार आहेत सोबतच त्यांची परेड देखील निघणार असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. गणेशोत्सवामध्ये महिलांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष असणार आहे. त्यासाठी मदत केंद्र असतील. या मदत केंद्रांमध्ये पोलीस ठाणे, विशेष शाखा, गुन्हे शाखा आणि वाहतूक शाखेतील कर्मचारी काम करत असणार आहेत. मोबाईल चोरी, महिलांकडील दागिने चोरणारे चोरट्यांची माहिती घेणं सुरू असून पोलिसांनी कडक कारवाईचा इशारा दिला आहे.

पुण्यामध्ये वाढत्या गुन्हेगारी मुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 1 सप्टेंबर च्या रात्रीच दोन खूनांच्या घटनेने पुणे हादरून गेलं आहे. यामध्ये वनराज आंदेकरचा खून नाना पेठ चौकात झाला त्याच्यावर 5 राऊंड गोळ्या झाडण्यात आल्या तर हडपसर मध्ये फायनांस कंपनीच्या मॅनेजरचा खून झाला आहे.
यंदा पुण्यामध्ये गणेशोत्सवाच्या काळात लेझर लाईट वर बंदी आहे त्यामुळे मिरवणूकांमध्ये आता झगमगाट नसणार आहे. तसेच यंदा मिरवणूका देखील फार काळ रेंगाळत न ठेवता चालणार असल्याने त्या देखील लवकर संपवण्याचा प्रयत्न असणार आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *