ठाणे महापालिकेअंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरु जाणून घ्या पात्रता, पगार अन् अटी

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

 

ठाणे महापालिकेअंतर्गत विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून वैद्यकीय आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी, परिचारिका महिला, पुरुष आणि बहुउद्देशीय कर्मचारी पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहे. या भरती प्रक्रियेतील उमेदवारांना ११ महिने २९ दिवस कालावधीसाठी कंत्राटी स्वरूपात व करार पद्धतीने नोकरीवर ठेवले जाणार आहे. इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे, अर्ज करण्याची शेवटी तारीख ७ सप्टेंबर २०२४ आहे. पण, अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता, पगार आणि इतर अटी नियम यांची सविस्तर माहिती करून घ्यावी.

 

ठाणे महानगरपालिका भरती २०२४ 
रिक्त जागा – ३६
पदाचे नाव आणि तपशील

वैद्यकीय अधिकारी – १२
परिचारिका (महिला) – ११
परिचारिका (पुरुष) – ०१
बहुउद्देशीय कर्मचारी – १२

शैक्षणिक पात्रता :

वैद्यकीय अधिकारी पदासाठी उमेदवार MBBS/BAMS पदवीधार असावा; यासह महिला, पुरुष परिचारिका पदासाठी उमेदवाराने बीएसस्सी नर्सिंगचा कोर्स पूर्ण केलेला असावा. याशिवाय बहुउद्देशीय पदासाठी उमेदवार १२ वी (Science) उत्तीर्ण असण्याशिवाय त्याने पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स उत्तीर्ण केलेला असावा.

वयाची अट :

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान वय १८ ते कमाल ७० वर्षांपर्यंत असावे, पण ही वयोमर्यादा प्रत्येक पदानुसार वेगळी आहे, त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी वयोमर्यादा तपासून पाहा.

पगार :

वैद्यकीय अधिकारी : ६० हजार रुपये प्रति महिना
परिचारिका (महिला, पुरूष) : २० हजार रुपये प्रति महिना
बहुउद्देशीय कर्मचारी (पुरुष) MPW) : १८ हजार रुपये प्रति महिना

 

अर्ज पाठविण्याचा पत्ता :

ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पांचपाखाडी, ठाणे (प)-४००६०२.

अर्ज करण्याची शेवटची तारीख :

०७ सप्टेंबर २०२४

नोकरीचे ठिकाण : ठाणे

अर्ज शुल्क

खुल्या प्रवर्गातील उमेदवार : १५० रुपये

राखीव प्रवर्गातील उमेदवार : १०० रुपये

महत्त्वाच्या लिंक

ठाणे महापालिका भरती जाहिरात
Municipal Corporation Recruitment PDF

ऑनलाइन अर्जाची लिंक
TMC//docs.google.com/forms

अधिकृत वेबसाइट
https://thanecity.gov.in/tmc/CitizenHome.html


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *