लेखणी बुलंद टीम:
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. या प्रकरणी मविआ आज आंदोलन करणार आहे. रविवारी हुतात्म चौक ते गेट वे ऑफ इंडिया असा निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. संपुर्ण शहरात आज मुंबई पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गेटवे ऑफ इंडिया पर्यटकांसाठी सकाळी १० वाजल्यापासून बंद राहणार आहे. आज हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडिया परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मविआच्या निषेधार्थ महायुतीने आज राज्यभरात आंदोलनाची हाक दिली आहे. सकाळी ६ वाजल्यापासून मुंबई पोलिस बंदोबस्त करण्यासाठी तैनात झाले आहे.