लेखणी बुलंद टीम:
पुण्यात एका 10 वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. माहितीनुसार, एका 67 वर्षीय व्यक्तीने पाचवीमाध्येब शिकणाऱ्या विद्यार्थिनीसोबत घृणास्पद कृत्य केले. पीडित कुटुंबाच्या तक्रारीवरून पोलिसांनी दिलीप नामदेव नावाच्या वृद्धाला अटक केली असून, त्याची चौकशी सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा विचार करून शनिवारी शाळेत ‘गुड टच’ आणि ‘बॅड टच’ या विषयावर कार्यशाळा सुरू होती. यावेळी विद्यार्थिनीने तिच्या शिक्षिकेला एका काकाने आपल्यासोबत गैरवर्तन केल्याचे सांगितले.