डोंबिवलीत 35 वर्षीय व्यक्तीकडून 10 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीस अटक

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

 

डोंबिवली तील दहा वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी रविवारी एका 35 वर्षीय तरुणाला अटक केली. माहितीनुसार, शनिवारी दुपारी पीडित मुलगी खेळण्यासाठी आरोपीच्या घरी गेला असताना आरोपीने तिच्यावर अत्याचार केला. आरोपी त्यावेळी घरात एकटाच होता. आरोपीने मुलीला अयोग्यरित्या स्पर्श करून तिच्यावर बलात्कार केला.

 

मानपाडा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राम चोपडे यांनी सांगितले की, कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर आम्ही आरोपीला अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. धर्मेंद्र यादव, असे आरोपीचे नाव असून तो शहरात मजूर म्हणून काम करतो. धर्मेंद्र हा आपली पत्नी, एक मुलगा आणि मुलीसह पीडितेच्या घराजवळ राहत होता. पीडितेने हा संपूर्ण प्रकार तिच्या आईला सांगितल्यानंतर ही घटना उघडकीस आली.

 

तथापी, अंबरनाथमध्ये काही दिवसांपूर्वी सार्वजनिक शौचालयात नऊ वर्षांच्या मुलीला अश्लील व्हिडिओ दाखवल्याप्रकरणी एका 35 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली होती. मुलीने प्रतिकार केल्यानंतर आरोपीने तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर अल्पवयीन मुलीने घरी धाव घेत संपूर्ण घटना तिच्या आईला सांगितली. त्यांनी 21 ऑगस्ट रोजी पोलीस ठाण्यात जाऊन आरोपीविरोधात तक्रार दाखल केली होती. अलिकडे राज्यात लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे पालकांमध्ये भीतीचं वातारवण पसरलं आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *