दिल्लीमध्ये अनियंत्रित ट्रकने पाच जणांना दिली धडक, तिघांचा मृत्यू, चालक फरार

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

 

दिल्लीतील  शास्रीनगर परिसरात सोमवारी सकाळी पहाटे अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रस्त्याच्या कडेला झोपलेल्या पाच जणांना ट्रकने धडक दिली. या धडकेत तिघांचा मृत्यू झाला आहे. तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. पहाटे पोलिसांनी अपघात झाल्याचा फोन आला होता. त्यावेळी तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतला.

 

मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे 5 च्या दरम्यान शास्री पोलिसांनी अपघात झाल्याचा पीसीआरला कॉल आला. सीलमपूर येथील लोखंडी पूलावरून जात असताना ट्रकचा अपघात झाला. ट्रक अनियंत्रित झाल्याने हा अपघात घडला.प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, ट्रक शास्त्रीनगरहून जात होता. ट्रक चालक अपघात झाल्यानंतर घटनास्थळावरून फरार झाला.

 

या अपघातात मुस्ताक आणि कमलेश दोघे जखमी झाले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मृतांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरु आहे. आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळी सीसीटीव्ही तपासणे सुरु केले आहे. आरोपीला पकडण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. या अपघातानंतर रस्त्यावर सकाळी वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी काही वेळानंतर वाहतुक सेवा सुरळीत केली.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *