नांदेड काँग्रेसचे लोकसभा खासदार वसंत चव्हाण यांचे निधन

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

महाराष्ट्रातील नांदेड काँग्रेसचे लोकसभा खासदार वसंत चव्हाण यांचे सोमवारी सकाळी निधन झाले. मिळालेल्या माहितीनुसार गेल्या अनेक महिन्यांपासून ते आजारी होते. तसेच त्यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना हैदराबाद येथील क्रीम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता.

मिळालेल्या माहितीनुसार रविवारी त्यांची प्रकृती अधिकच गंभीर झाली. त्यानंतर सोमवारी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर नांदेड येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.तसेच वसंत चव्हाण 2009 मध्ये नायगाव विधानसभा मतदारसंघातून विजयी होऊन पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेत पोहोचले. त्यांनी ही निवडणूक अपक्ष म्हणून लढवली होती. तसेच यानंतर त्यांचा राजकीय आलेख चढता राहिला. सप्टेंबर 2014 मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि पक्षात प्रवेश करण्यापूर्वी मे महिन्यातच त्यांची लोकलेखा समितीवर नियुक्ती झाली.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *