२४ ऑगस्टला महाराष्ट्र बंद किती वाजेपर्यंत असेल, उद्धव ठाकरे यांनी दिली माहिती

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

 

“कालचाच विषय आहे. एकूणच राज्यात जी अस्वस्थता आहे, तोच विषय आहे. मी तुमच्या माध्यमातून जनतेशी बोलत आहे. राजकीय कारणासाठी बंद नाही. विकृती विरुद्ध संस्कृती यासाठी बंद आहे. पालकांना असं वाटतं की मुलगी शाळेत सुरक्षित राहील का? कार्यालये असतील, रुग्णालये असतील तिथे आपण सुरक्षित राहू का? असं माता भगिनींना वाटत का?. या अस्वस्थततेला वाचा फोडण्यासाठी बंद आहे” असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. “आम्ही विरोधी आहोत. विकृतीच्या विरोधात आम्ही बंद पुकारत आहोत. आजपर्यंत जसा बंद झाला, तसाच बंद असेल. सर्व नागरिकांचा बंद असेल. जात पात धर्माचा भेद नसेल. याच्या कक्षा ओलांडून सर्वांनी बंदमध्ये यावं. हा सामाजिक प्रश्न आहे” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

 

“आजपर्यंतच्या बंदसारखाच असेल. कडकडीत बंद असावा. पण त्यात अत्यावश्यक सेवा आहे. पेपर, अग्निशमन दल आरोग्य सेवा चालू राहतील. सणासुदीचे दिवस आहे. गणपती बाप्पा येत आहे. दहीहंडीचा सराव आहे. उद्या दुपारी दोन वाजेपर्यंत बंद पाळा. कारण उत्सव आहे. सरकारला काही म्हणू द्या. मी जनतेच्या वतीने बोलतो” असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

 

ते थोबडवणंही राजकारणाने प्रेरित आहे का?

“निवडणुकीतच जनतेने मत व्यक्त केलं पाहिजे असं नाही. मधल्या काळातही करावं. यंत्रणावेळेत हल्ली नसती तर उद्रेक झाला नसता. राजकारणाने प्रेरित हा बंद असल्याचं काही लोक म्हणत आहे. मग उच्च न्यायालयाने स्वतहून या प्रकरणाची दखल घेतली ती काय राजकारणाने प्रेरित आहे का? राज्य सरकारला थोबडवलं आहे ते थोबडवणंही राजकारणाने प्रेरित आहे का?” असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

 

त्यासाठीच हा उद्याचा बंद

“जर उच्च न्यायालय स्वतहून दखल घेत असेल तर मी म्हणेन उत्स्फूर्तपणे विचारत असेल तर जनतेलाही विचारता येईल. जनतेचं न्यायालय वेगळं आहे. जनतेचा दरवाजा उघडत आहे. यंत्रणांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव होण्यासाठी हा दरवाजा उघडत आहे. त्यासाठीच हा उद्याचा बंद आहे. उद्याच्या बंदचं यश अपयश राजकारणात मोजायचं नाही. बंद हा विकृती विरुद्ध संस्कृती विरुद्ध असेल. त्यामुळे त्याचं यश अपयश हे विकृती विरुद्ध संस्कृती असं असेल” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

 


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *