लेखणी बुलंद टीम:
बदलापूर मध्ये घडलेल्या घटनेनंतर बदलापूरकरांनी काल रस्त्यवर उतरत या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन केलं. रेल्वे ट्रॅकवर उतरत बदलापूरकरांनी रेलरोको आंदोलन केलं. या घटनेचे राज्यभर पडसाद उमटत आहेत. ठिकठिकाणी आंदोलनं केली जात आहेत. सोशल मीडियावरही याबाबतच्या पोस्ट पाहायला मिळत आहेत. सिनेसृष्टीतील कलाकारांनी याबाबत आपली मतं व्यक्त केली आहेत. अभिनेते किरण माने यांनी फेसबुक पोस्ट लिहित घटनेचा निषेध केला आहे.
किरण मानेंची प्रतिक्रिया
किरण माने यांनी फेसबुक पोस्ट लिहिली आहे. यात त्यांनी बदलापूर घटनेवरून सरकार आणि गृहखात्याला काही प्रश्न विचारले आहेत. लाडकी बहीण योजनेचा दाखला देत त्यांनी सरकारवर टीका केली आहे. ‘ती’ स्त्रित्वाच्या सुरक्षिततेपेक्षा तुम्ही फेकलेल्या दिड हजार रुपड्यांना भुलेल, असं तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही तुमच्या बहिणीला ओळखलेलं नाही, असं म्हणत किरण माने यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.