लेखणी बुलंद टीम:
18 ऑक्टोबर रोजी ‘पाणी’ चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने आदिनाथ कोठारे दिग्दर्शनात पदार्पण करत असून राजश्री एंटरटेन्मेंटसारखा मोठा बॅनर, इंटरनॅशनल आयकॉन अशी ख्याती असणारी प्रियांका चोप्रा आणि महाराष्ट्राची शान असलेले कोठारे व्हिजन प्रा. लि.असे तिन्ही मोठे निर्माते एकत्र येत आहेत. या तिघांच्या एकत्र येण्याने मराठी सिनेसृष्टीला एक सर्वोत्कृष्ट चित्रपट अनुभवायला मिळणार आहे.
नितीन दीक्षित आणि आदिनाथ कोठारे यांची कथा असणाऱ्या ‘पाणी’मध्ये आदिनाथ कोठारे, रुचा वैद्य, सुबोध भावे, रजित कपूर, किशोर कदम, नितीन दीक्षित, सचिन गोस्वामी, मोहनाबाई, श्रीपाद जोशी, विकास पांडुरंग पाटील अशी तगडी स्टारकास्ट आहे. नेहा बडजात्या, दिवंगत रजत बडजात्या, प्रियांका चोप्रा जोनस, डॅा. मधू चोप्रा या चित्रपटाचे निर्माते आहेत. तर महेश कोठारे, सिद्धार्थ चोप्रा या चित्रपटाचे सहयोगी निर्माते आहेत.
‘पाणी’या चित्रपटाबद्दल पर्पल पेबल पिक्चर्सची संस्थापक आणि प्रवर्तक प्रियांका चोप्रा हिने प्रतिक्रिया दिली आहे.’पाणी’ हा चित्रपट जगभरातील प्रेक्षकांसाठी घेऊन येताना खूप आनंद होतोय. एक असा उत्कट प्रकल्प जो अतिशय महत्वाचा मुद्दा हाताळणार आहे, असं प्रियांका चोप्रा म्हणाली.
‘पाणी’ हा चित्रपट खूप खास आहे. निर्मितीसाठी आव्हानात्मक असला तरी आपण ज्या काळात राहात आहोत, त्या काळासाठी तो खूप प्रासंगिक आहे. हा एका अशा माणसाचा प्रवास आहे, ज्याने आपल्या आजुबाजुच्या सर्वांच्याच जीवनात आमुलाग्र बदल घडवला. हा प्रवास सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. आदिनाथचं दिग्दर्शन विशेष उल्लेखनीय आहे. या संपूर्ण टीमचे, त्यांच्या मेहनतीचे मनापासून आभार. माझा चौथा मराठी चित्रपट मी राजश्री एंटरटेनमेंट आणि कोठारे व्हिजन प्रायव्हेट लिमिटेड यांच्यासारख्या दोन बलशाली संस्थेसोबत घेऊन येत आहे. याचा मला आनंद आहे, असंही प्रियांका म्हणाली.