जाणून घ्या ! स्टारबक्सच्या नव्या CEO बद्दल ,घरबसल्या कमवतायत तब्बल ९५० कोटी

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

 

 स्टारबक्स या जगातील सर्वात मोठ्या कॉफी चेनने नुकतेच लक्ष्मण नरसिंहन यांची पुढील मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून नियुक्ती केली आहे. आता, द गार्डियनने एका वृत्तात म्हटले की कंपनी त्यांना मोठ्या प्रमाणात पगार देणार आहे. पाच दशक जुन्या लोकप्रिय कॉफी चेन स्टारबक्स कॉफी कंपनीची जगभरात ३४,००० दुकाने आहेत.

 

स्टारबक्सन त्यांच्या नव्या CE0 पदाची जबाबदारी घेणाऱ्या ब्रायन निकोल यांना मोठ्या पगाराची घोषणा केली आहे.कॉफीच्या दिग्गज कंपनीने निकोल यांना ११३ मिलियन म्हणजेच तब्बल ९४८ कोटींची ऑफर केली आहे.५० वर्षीय निकोल यांना १ कोटी डॉलर साइन ऑन बोनस आणि ७.५ कोटी डॉलर इक्विटी दिली आहे. महत्वाच म्हणजे ते स्टारबक्सच्या सिएटल मुख्यालयात शिफ्ट होणार नाहीत. मात्र आवश्यकतेनुसार ये-जा करण्याचे त्यांनी मान्य केले आहे. कंपनी त्यांच्यासाठी CALIFORNIA मध्ये एक छोटे कार्यालय उघडणार आहे.त्यांना एक कार  दिली जाईल,त्यासोबत खासगी वाहन चालकही असेल. सिएटलमध्ये त्यांना जे घर दिले जाईल आणि त्याचा खर्च कंपनी करणार आहे.

 

भारतीय वंशाचे लक्ष्मण नरसिंहन यांची जगातील सर्वात मोठी कॉफी चेन स्टारबक्सचे नवीन सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. स्टारबक्स कॉर्पने गुरुवारी लक्ष्मण नरसिंहन यांची पुढील मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून नियुक्तीची औपचारिक घोषणा केली. आतापर्यंत नरसिंहन हे रेकिटचे सीईओ होते. त्याआधी नरसिंहन यांनी पेप्सिकोमध्येही अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. पेप्सिको येथे त्यांनी ग्लोबल चीफ कमर्शियल ऑफिसर म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. तसेच त्यांनी मॅकिन्से अँड कंपनी या सल्लागार कंपनीत वरिष्ठ भागीदार म्हणूनही काम केले आहे.

 ३० वर्षांचा अनुभव
लक्ष्मण नरसिंहन यांनी पुणे विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनीअरिंग केले. ५५ वर्षीय लक्ष्मण यांना आंतरराष्ट्रीय ग्राहक ब्रँड्सचे व्यवस्थापन आणि सल्लामसलत करण्याचा ३० वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. नरसिंहन हे सप्टेंबर २०१९ मध्ये रेकिट कंपनीत रुजू झाले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने नवीन उंची गाठली. कंपनीच्या आरोग्य आणि स्वच्छता उत्पादनांच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यांच्या योगदानाचा अंदाज यावरून लावता येतो की गुरुवारी लक्ष्मणने रेकिट सोडल्याची बातमी समोर येताच रेकीटचे शेअर्स ४ टक्क्यांनी घसरले.

 स्टारबक्स सध्या कठीण काळातून जात आहे. अमेरिकेमधील सुमारे २०० स्टोअरमधील कर्मचारी वाढत्या महागाईच्या अनुषंगाने चांगले फायदे आणि वेतनाची मागणी करण्यासाठी युनियन तयार करत आहेत. करोनाच्या निर्बंधांमुळे चीनमधील कंपनीचा व्यवसाय जवळपास ठप्प झाला आहे. त्यामुळे कंपनीला पुन्हा नव्या उंचीवर नेण्यासाठी नरसिंहन यांच्याकडे कंपनीची कमान सोपवण्यात आली आहे.

 स्टारबक्स ही जगातील सर्वात मोठी रोस्टर आणि स्पेशॅलिटी कॉफीची किरकोळ विक्रेता यांच्यासोबत काम करतील.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *