लेखणी बुलंद टीम:
‘तारक मेहता का उल्टा चष्माचे निर्माते, नीला फिल्म प्रॉडक्शन प्रायव्हेट लिमिटेड यांनी सांगितले की, शोचे शीर्षक, पात्र, चेहरे, पद्धती, संवाद आणि इतर घटक आता कायद्यानुसार संरक्षित आहेत. काही महिन्यांपूर्वी शोच्या निर्मात्यांनी आरोप केला होता की, अनेक वेबसाइट्स ‘तारक मेहता’चे पात्र, नाव आणि इमेजचा गैरवापर करत आहेत. अनेक सोशल मीडिया खाती, वेबसाइट्स आणि यूट्यूब चॅनेल याचा गैरवापर करताना दिसले आहेत. बेकायदेशीरपणे वापर करत ॲनिमेशन, डीपफेक, एआय-जनरेट केलेले फोटो आणि पात्रांशी संबंधित अश्लील सामग्री पसरवली जात आहे.
४८ तासांची मुदत
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता न्यायमूर्ती मिनी पुष्कर्णा यांनी निर्मात्यांच्या बाजूने निकाल दिलाय. त्यांनी मालिकेशी संबधित कंटेंट युट्यूबवरून काढण्याचे आदेश दिले आहेत. सोशल मीडियावरुन सर्व आक्षेपार्ह व्हिडिओ हटवण्यासाठी ४८ तासांची मुदत देण्यात आली आहे. ४८ तासांच्या आत आक्षेपार्ह मजकूर काढला नाही तर या सर्व लिंक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून ब्लॉक केल्या जाणार आहेत. इतकंच नाही तर त्यांच्यावर कारवाई देखील केली जाणार आहे.