“तुमचा भाऊ आहे तुम्ही काळजी करु नका”, मुंबई-गोवा मार्गाच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे याचं आश्वासन

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

 मुंबई-गोवा महामार्गासाठी (Mumbai Goa Highway) गुरुवारपासून उपोषण सुरु आहे. उपोषणकर्त्यांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी व्हिडीओ कॉलद्वारे चर्चा करून भेटीसाठी येण्याचे आश्वासन दिले आहे. “साहेब, मुंबई-गोवा महामार्गाची अवस्था इतकी बेकार झाली की मी आता काय करू”, असं आमदार भरत गोगावले यांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यथा मांडतं म्हटलं. “तुमचा भाऊ आहे तुम्ही काळजी करु नका”, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई-गोवा मार्गाच्या उपोषणकर्त्यांना व्हिडीओ कॉलद्वारे आश्वासन दिलं आहे.

 

मुंबई-गोवा महामार्गाचा प्रश्न सोडवण्याचं मुख्यमंत्र्यांदचं आश्वासन

गेली 17 वर्ष रखडलेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुरावस्थेबाबत स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी माणगावमध्ये अनेक संघटनांनी आमरण उपोषण केलं. सलग दुसऱ्या दिवशीही या कार्यकर्त्यांनी आपला उपोषण सुरू ठेवलं. शुक्रवारी या कार्यकर्त्यांना शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी भेट देऊन थेट मुख्यमंत्र्यांसोबत फोनवरुन संपर्क साधून दिला. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुमचा भाऊ अजून आहे, त्यामुळे लवकरच या रखडलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण होईल, असं आश्वासन दिलं आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *