निव्वळ छंद म्हणून, एकच चावी वापरून दुचाकीचे लॉक खोलायचा; सराईत चोरट्याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Spread the love

लेखणी बुलंद टीम :

 

आजकालच्या जगात कोण काय करेल याचा काहीच भरोसा नाही. असाच एक प्रकार मुंबईत उघडकीस आलाय जिथे एक माणूस निव्वळ छंद म्हणून चोरी करायचा. एकाच चावीने तो बाईक्सचे लॉक उघडून त्या चोरून पसार व्हायचा. असं करत करत त्याने केवळ एक-दोन नव्हे तर तब्बल 8 दुचाकी चोरल्या. अखेर पोलिसांनी सापळा रचून त्याला बेड्या ठोकल्या आणि त्याच्याकडून चोरीच्या आठही बाईक्स जप्त केल्यात. साहील शेख असे आरोपीचे नाव असून रफी अहमद किडवई मार्ग पोलिसांनी मंगळवारी त्याला अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, १२ ऑगस्ट रोजी ग. द. आंबेकर मार्ग परिसरातून दुचकी चोरीची तक्रार आर ए के मार्ग पोलिसांना मिळली होती. प्रभारी पोलीस निरीक्षक सतीश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अण्णासाहेब गादेकर आणि पथकाने सीसीटीव्ही फुटेज पाहिलं आणि त्या आधाआरे चोरी करणाऱ्याची ओळख पटवली, तो आरोपी साहिल असल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने लगेचच अँटॉप हिल येथील गांधीनगर येथे सापळा रचला आणि आरोपी साहिलला अटक केली.

चौकशीत त्याने केलेल्या खुलाशाने पोलिसांनाही धक्का बसला. आरोपी साहिल याला बाईक्स चोरी करण्याचा छंद होता. केवळ छंद म्हणूनच तो या चोरी करायचा. त्याच्याकडे एकच चावी होती, रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बाईक्स तो हेरायचा. आणि त्या एकाच चावीने तो बाईक्सचे लॉक उघडून, त्या चोरून पसार व्हायचा. असं करत त्याने तब्बल 8 बाईक्स चोरल्या. पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर आठही बाईक्स हस्तगत केल्या. पुढील चौकशीत चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

हॅण्डल लॉक तोडून मोटारसायकल चोरणाऱ्या सराईत चोरट्याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

दरम्यान कल्याण डोंबिवली परिसरात उभ्या असलेल्या मोटारसायकचे हॅण्डल लॉक तोडून मोटारसायकल लंपास करणाऱ्या सराईत चोरट्याला सिसिटीव्हीच्या मदतीने डोंबिवली पोलिसांनी ठोकल्या बेड्या आहेत. राम रमेश पोटे असे या आरोपीचे नाव असून 13 ऑगस्ट रोजी आरोपीने डोंबिवली राजाजी पथावर उभी असलेली मोटारसायकल चोरली होती. ती घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. त्यानंतर डोंबिवली पोलिसांनी सापळा रचत आरोपीला केळकर रोड वरून ताब्यात घेतले. त्याचे दोन गुन्हे उघडकीस आणत 25 हजाराची मोटर सायकल देखील जप्त केली आहे. सध्या हा आरोपी पोलिसाच्या ताब्यात असून त्याने अजून किती ठिकाणी चोरी केली आहे याचा तपास पोलीस करत आहेत.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *