मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत यंदा एसटी महामंडळाचा ‘इतक्या’ कोटींचा नफा

Spread the love

 

जुलै महिन्यात एसटी महामंडळाचा तोटा 22 कोटी इतका झालेला आहे. यंदा एप्रिल ते जुलै, 2024 मध्ये मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत 131 कोटी रुपयांनी तोटा कमी झाला आहे. मे 2022 पासून एसटीची सुरळीत वाहतूक सेवा सुरू झाली. तथापि, एसटीचा घटलेला प्रवासी पुनश्च एसटीकडे वळविणे हे मोठे आव्हान होते. यावेळी राज्य शासनाने 75 वर्षावरील ज्येष्ठांना सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवास व सर्व महिलांना एसटीच्या प्रवासी तिकिटात 50 टक्के सवलत या दोन योजना सुरू केल्यात.

 

वर्षभरात एसटी प्रशासनाने विद्यार्थ्यांना शाळेत थेट पास, प्रवासी राजा दिन, कामगार पालक दिन, श्रावणात एसटी संगे तीर्थाटन, असे अनेक अभिनव उपक्रम राबविले. तसेच जे विभाग गेली कित्येक वर्ष तोट्यामध्ये आहेत, त्या विभागांना मार्गदर्शन करण्यासाठी मध्यवर्ती कार्यालयाकडून पालक अधिकाऱ्यांची नियुक्ती केली गेली. स्थानिक पातळीवर आगारनिहाय कर्मचारी व अधिकारी यांच्या बैठका घेण्यात आल्या. तोट्याच्या मार्गावरील बस फेऱ्या बंद करून, त्या ज्या मार्गावर प्रवासी जास्त आहेत तेथे वळविण्यात आल्या आहे.

 

जालना (3.34 कोटी), अकोला (3.14 कोटी), धुळे (3.7 कोटी), परभणी (2.98 कोटी), जळगाव (2.40 कोटी), बुलढाणा (2.33कोटी) या ‍विभागांनी 2 कोटी पेक्षा जास्त नफा कमावला आहे. ऑगस्ट महिन्यात हा नफा आणखी वाढून एसटीला गतवैभव प्राप्त होईल असा विश्वास एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी व्यक्त केला आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *