लेखणी बुलंद टीम:
पालथं झोपल्याने हार्ट अटॅक येतो का? तज्ञ सांगतात
शरीर निरोगी ठेवण्यासाठी पुरेशी झोप घेणं अत्यंत आवश्यक आहे. अपुऱ्या झोपेमुळे रक्तदाब जळजळ रक्तातील साखरेची पातळी यांचे नियमन करणारे अनेक घटक झोपेवर अवलंबून असतात. पुरेशा झोपेसह तुम्ही कसे झोपता यावरही अनेक गोष्टी अवलंबून असल्याचे तज्ञ सांगतात. अनेकांना पालथ झोपायची सवय असल्याने छातीवर दबाव निर्माण होऊन रक्तप्रवाह कमी होणे किंवा श्वसनाच्या समस्यांना सामोरे जावं लागतं. याचा एकत्रित ताण मज्जातंतून वर येऊन हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीत विकार होण्याची शक्यता असते.
हृदयविकार हा प्रामुख्याने रक्तवाहिन्यांच्या भोवती चरबी जमा झाल्याने तसेच कोलेस्ट्रॉल सारख्या कारणांमुळे होतो. पालथ झोपण्याचा आणि हार्ट अटॅक येण्याचा थेट संबंध नसल्याचेही तज्ञ सांगतात. मात्र हृदयविकाराचा झटका येणं याआधी स्नायूंना रक्तपुरवठा खंडित होणाऱ्या अनेक क्रिया घडत असतात. पालथे झोपल्याने छातीवरील दबाव वाढवून अशा समस्या येऊ शकतात. श्वसनाच्या समस्याही या झोपेच्या स्थितीत येऊ शकतात.