‘मुख्यमंत्री लोचट मजनू आहेत’, संजय राऊत यांची एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

 

मुख्यमंत्री लोचट मजनू आहेत. अतिशय लोचट मुख्यमंत्री दिल्लीच्या दारात गेलाय. यापूर्वी दिल्लीसमोर झुकणारे अनेक मुख्यमंत्री पाहिले, पण इतका लोचट मुख्यमंत्री पहिला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला वेदना होईल असं वर्तन मुख्यमंत्री करतात. हे दिल्लीचे पोपट म्हणून बोलतात. ज्या दिवशी त्यांना दिल्ली पायाशी ठेवणार. महाराष्ट्राला बदल हवाय त्यासाठी आम्ही कंबर कसतो आहोत. असे खासदार संजय राऊत म्हणाले.

 

आमचं सरकार आल्यावर लाडक्या बहिणीच्या रकमेत भरघोस वाढ करू

सरकारी तिजोरीतून पैशांची उधळपट्टी केली. लाडक्या बहिणींना पैसे मिळायलाच हवे. पण पंधराशेच्या आकड्यात आमचं सरकार आल्यावर भरघोस वाढ होईल. लोकसभा निवडणूक झाली. त्यापूर्वी फुटलेले लाडके आमदार, फुटलेले लाडके खासदार या पलीकडे यांचे लाडके कोणी नव्हतं. कुठे देण्यात आले एकेक आमदाराला 50 -50 कोटी देण्यात आले. काही जणांना शंभर शंभर कोटी देण्यात आले. शिवसेनेचे पदाधिकारी फोडण्यासाठी कोट्यवधी रुपये देण्यात येतात. पण लाडक्या बहिणीसाठी पंधराशे रुपये, अशी जोरदार टीका राऊतांनी केली.

 

कोणत्याही परिस्थितीत सरकार बनवायचं

महाराष्ट्रातलं वातावरण महाविकास आघाडीसाठी अनुकूल आहे. सत्तांतरासाठी महाविकास आघाडी काम करत आहे. कोणत्याही परिस्थितीत सरकार बनवायचं. पैसा आणि सत्य समोर महाराष्ट्र झुकला जाणार नाही हे आम्ही लोकसभेत दाखवून दिलं.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *