भारत आणि अमेरिकेमध्ये टॅरिफच्या मुद्दावरून तणावाचे वातावरण असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारताबद्दल भडकावू विधाने करताना दिसत आहेत. एकीकडे डोनाल्ड ट्रम्प हे भारताबद्दल आग ओकत आहेत तर दुसरीकडे मात्र, चीनचे काैतुक करत आहेत. यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारताविरोधात मोठा कट रचला जात असल्याचे दिसतंय. भारताच्या शेजारी देशांबद्दल चांगली विधाने करून ते भारताला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. हेच नाही तर अमेरिकेच्या भूमीवरून पाकिस्तानने भारताला मोठी धमकी दिली. टॅरिफच्या अटी भारत मानत नसल्याने डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दबाव तंत्राचा वापर केला जात आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मुलाखत दिली. यावेळी ते चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याबद्दल बोलताना दिसले. विशेष म्हणजे त्यांची काैतुक करण्यात आले. शी जिनपिंग यांनी त्यांना काय आश्वासन दिले हे त्यांनी सांगितले आहे. ट्रम्प म्हणाले की, जोपर्यंत ते राष्ट्राध्यक्ष आहेत तोपर्यंत चीन तैवानवर हल्ला करणार नाही किंवा अतिक्रमण. ट्रम्प पुढे म्हणाले, शी जिनपिंग यांनी मला सांगितले की, जोपर्यंत तुम्ही राष्ट्राध्यक्ष आहात तोपर्यंत मी असे कधीही करणार नाही.
मी त्यांची प्रशंसा आणि काैतुक करतो. ते धैर्यवान आहेत आणि चीन देखील. शी जिनपिंग यांच्यासोबत झालेल्या बोलण्यानंतर हे तर स्पष्ट आहे की, चीनकडून कोणत्याही प्रकारचा हल्ला हा तैवानवर होणार नाही आणि मला तसा विश्वास देखील आहे. तैवानवर अतिक्रमण देखील होणार नाहीये. एकीकडे भारतासोबत तणावाची स्थिती असताना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून पाकिस्तान आणि चीनबद्दल अशी विधाने केली जात आहेत.
टॅरिफच्या मुद्दावरून भारत आणि चीन एकत्र येत असताना मुलाखतीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून चीनचे काैतुक करण्यात आले आहे. मागील काही वर्षांचे व्यापार युद्ध विसरून डोनाल्ड ट्रम्प अशाप्रकारेचे काैतुक करताना दिसत आहेत. यासोबतच 90 दिवसांचा वेळ टॅरिफसाठी चीनला दिला आहे. फक्त वेळच नाही तर या टॅरिफच्या मुद्द्यावरून मार्ग काढण्याचेही काम सुरू आहे. आता भारत डोनाल्ड ट्रम्प यांच्या खेळीला कशाप्रकारे उत्तर देते हे पाहण्यासारखे ठरणार आहे.