एसबीआय बँकेच्या शाखेतील एटीएम मशीन चक्क थार गाडीच्या मदतीने ओढून फोडण्याचा प्रयत्न

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

छत्रपती संभाजीनगरच्या शहानूरवाडी दर्गा परिसरातून एक अतिशय खळबळजनक चोरीची घटना घडली आहे. यात एसबीआय बँकेच्या शाखेतील एटीएम मशीन चोरट्यांनी चक्क थार गाडीच्या मदतीने ओढून फोडण्याचा प्रयत्न केलाय. या घटनेत एटीएम मशीन आणि केबिनमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचेहि नुकसान करण्यात आले. या प्रकरणी चार अज्ञात आरोपींविरोधात जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी अधिक तपास सुरु केला आहे. मात्र चोरीसाठी चक्क थार कारचा वापर करून सुरु असलेल्या या धाडसी चोरीच्या प्रयत्नांची सध्या शहरात सर्वत्र चर्चा रंगू लागली आहे.

बँकेच्या एटीएम मशीनला महिंद्रा थार गाडीला बांधून ओढण्याचा प्रयत्न
पुढे आलेल्या माहितीनुसार, विशाल हरिदास इंदूरकर यांनी याप्रकरणी तक्रर दिली. ते एसबीआयच्या शहानूरवाडी शाखेत मॅनेजर आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, 4 ऑगस्टच्या पहाटे 3 ते 4 वाजेच्या दरम्यान चार अज्ञात इसमांनी बँकेच्या एटीएम मशीनला महिंद्रा थार गाडीला बांधून ओढण्याचा प्रयत्न केला. तसेच स्क्रू ड्रायव्हरने एटीएमचे कव्हर उचकटण्याचा प्रयत्न करत केबिनमधील कॅमेरेही फोडण्यात आले. परंतु चोरट्यांना हे शक्य न झाल्यामुळे त्यांनी ताबडतोब पळ काढला. याप्रकार बॅकेच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी याप्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून आरोपींचा शोध घेता आहे.

हातात कोयता घेऊन रील काढणाऱ्या तरुणांना पोलिसांनी घडवली अद्दल
अलीकडच्या काळात रील्सच मोठं वेड तरुणाईला लागल्याचं पाहायला मिळत आहे, त्यासाठी मग जीवघेणे स्टंट देखील केले जातात. तर कुठे कायदा हातात घेतला जातो. असाच प्रकार बुलढाण्यात घडला असून बुलढाणा शहरातील अमित बेंडवाल आणि आदित्य ऊर्फ शक्ती देशमुख या तरुणांनी हातात धारदार कोयता घेऊन रिल काढली आणि ती समाजमाध्यमावर व्हायरल केली. ही रिल पाहताच पोलिसांनी दोघांवर आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक केलीय, सोबतच त्यांच्या माफीनाम्याचा व्हिडिओ देखील पोलिसांनी शेअर करायला लावला.. त्यामुळे थोड्या प्रसिद्धीसाठी कायदा हातात घेणे या तरुणांना चांगलच भोवलय. कायदा हातात घेणारे किंवा सामाजिक तेढ निर्माण करणारे व्हिडिओ किंवा पोस्ट समाज माध्यमावर करू नये, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही यावेळी पोलिसांनी दिला आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *