लेखणी बुलंद टीम:
मेष : पथ्य-पाणी सांभाळा
दिनांक ३, ४ हे संपूर्ण दोन दिवस ५ तारखेला दुपापर्यंत असे हे अडीच दिवस जेमतेम राहतील. या दिवसांत नियोजन करून काम करायला हवे. शिवाय काम उशिरा होईल हे गृहीत धरून चाला, म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही. जी जबाबदारी आपल्याला जमणार नाही अशी जबाबदारी घेऊ नका. द्विधा अवस्थेतून बाहेर पडा. नारळीपौर्णिमा घरातील सर्वासोबत साजरी कराल. बाकी दिवस चांगले असतील. चांगल्या दिवसांमध्ये शुभ गोष्टी घडतील. व्यवसायात प्रगती होईल. नोकरदार वर्गाला बढती मिळेल.
वृषभ : अनपेक्षित लाभ होईल
दिनांक ५, ६, ७ असे तीन दिवस तुम्ही जे काम हाती घ्याल ते मागे राहील. दुसरेच काम करावे लागेल. त्यामुळे तुमची चिडचिड होईल. काम वेळेत पूर्ण होणार नाही आणि याचा सगळा राग तुम्ही कुटुंबीयावर काढाल. पण एक गोष्ट लक्षात घ्या, कुटुंबामुळे आज तुम्ही स्थिरस्थावर आहात. कुटुंबाला वेठीस धरून तुम्हाला फक्त त्रासच होईल. त्यापेक्षा शांतपणे निर्णय घ्या. एखादे काम कमी करा, म्हणजे त्रास होणार नाही. नारळीपौर्णिमा भाग्योदयाची असेल.
मिथुन : शांत राहा
षष्ठ स्थानातून अष्टमस्थानाकडे चंद्राचे भ्रमण होत आहे. ज्यावेळी असे भ्रमण असते त्यावेळी काळजी घ्यावी लागते. म्हणजेच कोणत्याही गोष्टीचा विचार न करता निर्णय घेणे म्हणजे नुकसान होण्यासारखे आहे. भावनेच्या आहारी जाऊन घेतलेले निर्णय चुकीचे ठरू शकतात. व्यावहारिक राहून निर्णय घेणे योग्य राहील. ज्या ठिकाणी वादविवाद होणार आहे अशा ठिकाणी शांत राहा, म्हणजे त्रास होणार नाही. नारळीपौर्णिमा कालावधी चांगला कसा जाईल ते पाहा. व्यवसायात जे चाललेले आहे ते चांगले समजून पुढे चला. नोकरदार वर्गाने कामाव्यतिरिक्त इतर गोष्टीत लक्ष देऊ नका. आर्थिक बचत करा. समाजमाध्यमांचा वापर जेवढय़ास तेवढा करा. कोणतेही काम करताना कुटुंबाला विश्वासात घ्या. आध्यात्मिक गोष्टीत गुंतून राहा.
कर्क : वादविवाद टाळा
दिनांक ५, ६, ७ हे तीन दिवस तारेवरची कसरत करावी लागेल. या दिवसांत स्वत:ला झेपेल अशाच गोष्टी करा. इतरांनी सांगितले म्हणून काही करू नका. शिवाय तुम्हाला जी गोष्ट जमणार नाही अशा गोष्टींचा नादच करू नका. प्रत्येक गोष्टीचे नियोजन तंतोतंत करा, म्हणजे तुम्हाला कामाचा कंटाळा येणार नाही व त्रासही होणार नाही. आपले काम इतरांनी करावे ही अपेक्षा सोडून द्या. स्वत:चे काम स्वत:च करावे लागेल. संवाद साधताना विनाकारण जुन्या गोष्टी उगाळत बसू नका. वादविवाद टाळा. बाकी दिवस चांगले असतील. पौर्णिमा कालावधी चांगला राहील. व्यवसायात व्यवहार जपून करा. नोकरदार वर्गाला कामात गुंतून राहावे लागेल. खर्च सांभाळा. समाज सेवा करताना भान ठेवा. मुलांसोबत करमणूक होईल. आरोग्याची काळजी घ्या.
सिंह : गरजेचे तेवढेच बोला
दिनांक ८, ९ या दोन दिवसांत संयम ठेवावा लागेल. काही गोष्टी तुमच्या मनाविरुद्ध होऊ शकतात, त्यामुळे तुम्हाला राग येऊ शकतो. अशा वेळी राग येऊन चालणार नाही. कारण ज्यावेळी दिवस असे असतात, त्यावेळी परिस्थिती तशीच निर्माण होते. अशा वेळी टोकाचे निर्णय घेऊन चालत नाही. म्हणून गरजेचे तेवढेच बोला, म्हणजे वादविवाद होणार नाहीत. पौर्णिमा कालावधीत शांत राहा. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. व्यवसायात ग्राहकांचा प्रतिसाद चांगला असेल. नोकरदार वर्गाला कामाच्या बाबतीत सध्या तरी दुहेरी भूमिका घ्यावी लागणार नाही. आर्थिकगोष्टींबाबत रोखठोक व्यवहार करा. सार्वजनिक ठिकाणी चांगल्या कामासाठी सहभाग राहील. संतती सौख्य लाभेल. घरगुती वातावरण चांगले राहील. योगसाधनेला महत्त्व द्या.
कन्या : चर्चा सफल होईल
सप्ताहातील सर्व दिवस चांगले आहेत. ज्यावेळी असे दिवस असतात त्यावेळी तुम्ही फुकटचा वेळ वाया घालवता. कोणतेही काम नीट आणि वेळेत करत नाही. इतरांचीच कामे करत बसता व इतरांसाठी वेळ देता, स्वत:चे काम मागे ठेवता. त्यामुळे दिवस चांगले असले की ते कसे जातात तुम्हाला कळत नाही आणि ज्यावेळी दिवस अनुकूल नसतात. त्यावेळी मात्र तुम्हाला असे वाटते की आमच्या आयुष्यात कुठलेच दिवस चांगले नाहीत. सध्या ग्रहमानाची साथ आहे.
तूळ : ज्येष्ठांची कृपा राहील
सर्व दिवस शुभ असतील. या आठवडय़ात असा कोणताच दिवस नाही की त्या दिवशी तुम्हाला फार संघर्ष करावा लागणार आहे. काही वेळेला प्रामाणिकपणे राहूनसुद्धा गोष्टी अंगलट येत होत्या; सध्या मात्र असे होणार नाही. तुमचे मत जे आहे ते इतरांना पटणारे असेल. प्रत्येक गोष्टीत आपले तेच खरे करण्याची वेळ आली आहे, सध्या अशी परिस्थिती निर्माण होणार आहे. तुम्ही म्हणाल ती पूर्व दिशा असेल. पौर्णिमा कालावधीत ज्येष्ठांची कृपा राहील. व्यवसायात अपेक्षेपेक्षा जास्त उत्पन्न मिळेल.
वृश्चिक : उत्कर्ष होईल
‘आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे’ सध्या असे वातावरण आहे. वातावरण असे असले तरी तुम्हाला काय निर्णय घ्यावेत सूचत नाही. कुठे जावे, काय करावे हे कळत नाही. इतरांच्या मर्जीने स्वत:चा आनंद ठरवता. स्वत:कडे दुर्लक्ष करता. सध्या असे न करता तुम्हाला काय करायचे आहे ते ठरवा आणि त्यानुसार निर्णय घ्या. इच्छा, अपेक्षा पूर्ण होणारे ग्रहमान आहे. या कालावधीत उत्कर्ष होईल. व्यवसायातील आवक वाढेल.
धनू : अनावश्यक खर्च टाळा
दिनांक ३, ४ हे संपूर्ण दोन दिवस व ५ तारखेला दुपापर्यंत अशा या अडीच दिवसांत सहनशीलता वाढवावी लागेल. तसेही वातावरण चांगले असले तरीही तुमचा रागाचा पारा नेहमीच असतो. माझ्या मर्जीने सगळय़ांनी वागावे अशी तुमची मानसिकता नेहमीच असते आणि अशा दिवसांत तर जास्त असते. तेव्हा अशा दिवसांत तुम्ही हेकेखोरपणाने वागल्यास तुमचे नुकसान होऊ शकते हे लक्षात ठेवा. स्वत:च्या हातून काही होत नाही. परंतु इतरांकडून मात्र अपेक्षा तुम्हाला जास्त असते ही अपेक्षा ठेवू नका. बाकी दिवस चांगले असतील. पौर्णिमा कालावधीत धाडस वाढेल. व्यवसायात वाढ होईल. नोकरदार वर्गाला नवीन कामाची सुरुवात करताना वरिष्ठांना विचारात घ्यावे लागेल. अनावश्यक खर्च टाळा. आपले कुटुंब आनंदी कसे राहिले याचाच फक्त विचार करा. योगसाधनेला महत्त्व द्या.
मकर : भटकंती टाळा
दिनांक ५, ६, ७ हे तीन दिवस चांगले कसे जातील एवढेच लक्षात ठेवा. कारण दिवस चांगले असो किंवा वाईट तुम्हाला मात्र नेहमी इतरांविषयी शंकाच निर्माण होत असते. त्यामुळे तुमच्या मनाची नेहमीच द्विधा अवस्था होत असते. इतरांच्या वैयक्तिक गोष्टींत हस्तक्षेप करू नका. आपल्या कामाव्यतिरिक्त कोणत्याही गोष्टीला महत्त्व देऊ नका. काम वेळेत कसे पूर्ण होईल ते पाहा. विनाकारणची भटकंती टाळा. बाकी दिवस चांगले असतील. पौर्णिमा तुमच्या राशीतूनच होत आहे. हा दिवस शुभ असेल. व्यवसायातील व्यवस्थापन उत्तम जमेल. नोकरदार वर्गाला कामाच्या बाबतीत प्रयत्न वाढवावे लागतील. आर्थिक व्यवहार जपून करा. मित्र-मैत्रिणींशी सलोखा वाढेल. करमणुकीचे बेत आखाल. वैवाहिक जीवन सुखाचे राहील. आरोग्याची काळजी घ्या.
कुंभ : तडजोड स्वीकारा
दिनांक ८, ९ हे दोन दिवस फारसे अनुकूल नाहीत, त्यामुळे या दोन दिवसांत कोणत्याही चांगल्या गोष्टींचा शुभारंभ करू नका. धीर धरून काम करा. इतरांनी केले म्हणून तुम्ही करायला जाऊ नका. तुमचे नुकसान होऊ शकते. आपल्याला दिवस चांगले नाहीत अशा वेळी शांत बसणे गरजेचे असते. ‘एक घाव दोन तुकडे’ करायला जाऊ नका. फार विचारपूर्वक आपल्याला काम करावे लागणार आहे. वादविवाद या गोष्टींपासून लांब राहा. तडजोड स्वीकारा म्हणजे नुकसान होणार नाही. बाकी दिवस चांगले असतील. पौर्णिमा कालावधीत सकारात्मक विचार करा. व्यवसायातील चढउतार लक्षात घ्या. नोकरदार वर्गाला वरिष्ठांकडून कामाचा आराखडा मिळेल. मित्र परिवाराची मदत मिळेल. घरगुती वातावरण ठीक राहील. आरोग्याची काळजी घ्या.
मीन : भाग्योदय होईल
भाग्यस्थानातून लाभस्थानाकडे होणारे चंद्राचे भ्रमण लाभदायक राहील. मागील काही दिवस कटकटीचे गेले असले तरी सध्याचे दिवस चांगले आहेत. आतापर्यंत ज्या गोष्टीचा शुभारंभ होत नव्हता, त्या गोष्टींचा शुभारंभ होईल. कोणावर अवलंबून राहण्याची वेळ येणार नाही. प्रत्येक कामामध्ये येणारा ताण-तणाव कमी होईल. कामे अगदी वेळेत पूर्ण होतील. इतरांची मदत मिळेल. पौर्णिमा कालावधी लाभदायक राहील. व्यवसायात फार मोठी गुंतवणूक कराल, त्यातून फायदा होईल. नोकरदार वर्गाला नवीन नोकरीचे प्रस्ताव येतील. आर्थिकदृष्टय़ा परिस्थिती उत्तम राहील. मित्र-मैत्रिणींशी सलोखा वाढेल. संतती सौख्य लाभेल. नातेवाईकांचे सहकार्य मिळेल. भावंडांच्या भेटीगाठी होतील. धार्मिक कार्य पार पडाल. मानसिक समाधान लाभेल. आरोग्य उत्तम राहील.
(टीप : वरील सर्व बाबी लेखणी बुलंद केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून लेखणी बुलंद कोणताही दावा करत नाही.)