देव तारी, त्याला कोण मारी ह्या म्हणीचा प्रत्यय पुन्हा एकदा आला असून नेहमी कटकट वाटणाऱ्या वाहतूक पोलिसामुळेच (Traffic police) एका कुटुंबीयाचा जीव बचावल्याची घटना समोर आली आहे. कारण, वाहतूक पोलीस म्हणजे कटकट, आता आपली पावती फाडणार, विनाकारण आपल्याला कागदपत्रांची मागणी करत पैसे खाणार, अशी सर्वसाधारण वाहतूकधारकांची धारणा असते. मात्र, वाहतूक पोलिसांनी दाखवलेली हीच नियमावली रोहरा कुटुंबीयांना नवं जीवदान देणारी ठरलीय. देव तारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यक्ष अनुभव अंधेरीत गौतम रोहरा कुटुंबाला आला आहे, कारमध्ये सीट बेल्ट लावल्यामुळे मोठा अपघात (Accident) होऊन देखील अंधेरीत (Mumbai) राहणाऱ्या गौतम रोहरा यांचा आणि कुटुंबीयांचा जीव वाचला.
मुंबईच्या अंधेरी परिसरातील पश्चिम-द्रुतगती महामार्गावर अंधेरी परिसरात फ्लायओव्हरवर उतरताना कार चालकाचे नियंत्रण सुटले आणि कारने 3 पलटी खाल्ल्या. या अपघाता गौतम रोहरा दाम्पत्याचा सुदैवाने जीव वाचला. कारण, अपघात आधी 15 मिनिटांपूर्वीच वाहतूक पोलिसांनी या दाम्पत्याची कार बीकेसी परिसरात अडवून सीट बेल्ट लावण्यात त्यांना भाग पाडले होते. सीट बेल्ट लावल्यामुळे मोठा अपघात होऊन सुद्धा रोहरा दाम्पत्याला किरकोळ जखम झाली आणि ते सुदैवाने बचावले. शनिवारी संध्याकाळी साडेतीन-चार वाजताच्या सुमारास रोहरा दाम्पत्याने बीकेसीकडून अंधेरीच्या दिशेने येत असताना त्यांनी कारमधील सीट बेल्ट लावले नव्हते. मात्र, बीकेसीमध्ये वाहतूक पोलिसांनी गाडी थांबवून सीटबेल्ट लावण्यास भाग पाडले. त्यानंतर, तिथून पुढे गेल्यावर अवघ्या पंधरा मिनिटात रोहरा यांचे कारवरील नियंत्रण सुटले आणि अंधेरी परिसरात त्यांचा कारचा मोठा अपघात झाला. या अपघातात कार तीन वेळा पलटी झाली. मात्र, केवळ सीट बेल्ट लावल्यामुळे या रोहरा दांपत्याचे प्राण वाचले. अंधेरी पोलिसांकडून वेळेवर मदत मिळाल्यामुळे रोहरा दांपत्याने अंधेरी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन अंधेरी पोलिसांचे आणि बीकेसी वाहतूक पोलिसांचे आभार मानले.
वाहतूक पोलिसांना भेटून मानले आभार
रोहरा दांपत्याकडून अंधेरी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत पोलीस शिपाई राजू लांडगे आणि वाहतूक पोलिसांचा प्रवीण क्षीरसागर यांना देवदूत म्हणत त्यांचे आभार मानण्यात आले आहेत. कारण, या अपघातात रोहरा कुटुंबीयांची कार दोन-तीन वेळा पलटी होऊनही केवळ सीटबेल्ट असल्यानेच त्यांचा जीव वाचला. विशेष म्हणजे याच पोलिसांनी त्यांची कार अडवून सीटबेल्ट लावण्यास भाग पाडले होते.