संतापजनक! अल्पवयीन मुलाला पॉर्न व्हिडिओ दाखवून लैंगिक छळ

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

मुंबई पोलिसांनी एका ४५ वर्षीय व्यक्तीला त्याच्या पाळीव कोंबडीसोबत अश्लील कृत्य केल्याबद्दल आणि त्याच्या शेजाऱ्याच्या मुलाला अश्लील व्हिडीओ दाखवून लैंगिक छळ केल्याबद्दल अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील बोरिवली परिसरात एक लज्जास्पद आणि अस्वस्थ करणारा प्रकार उघडकीस आला आहे. मुंबई पोलिसांनी एका ४५ वर्षीय व्यक्तीला त्याच्या पाळीव कोंबडीसोबत अश्लील कृत्य केल्याबद्दल आणि त्याच्या शेजाऱ्याच्या अल्पवयीन मुलाला पॉर्न व्हिडिओ दाखवून लैंगिक छळ केल्याबद्दल अटक केली आहे.

पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही घटना मंगळवारी रात्री घडली. आरोपी राजेंद्र रहाटे अविवाहित आहे. त्याने त्याच्या घरात डझनभर कोंबड्या पाळल्या आहे. त्याच्या घराच्या शेजारी राहणाऱ्या तक्रारदार व्यक्तीने सांगितले की, रात्री १०:३० वाजता त्याने रहाटेला त्याच्या खोलीत असलेल्या कोंबडीसोबत आक्षेपार्ह कृत्य करताना पाहिले.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, शेजाऱ्याने त्याच्या मोबाईलवरून रहाटेच्या घृणास्पद कृत्याचा व्हिडिओ बनवला आणि पोलिसांकडे तक्रार दाखल केली. नंतर, तक्रारदाराच्या १० वर्षांच्या मुलानेही एक धक्कादायक गोष्ट सांगितली. अल्पवयीन मुलाने सांगितले की, आरोपी रहाटेने त्याला अनेक वेळा अश्लील व्हिडिओ दाखवले होते आणि त्याच्या पालकांना काहीही न सांगण्याची ताकीद दिली होती.

तक्रारीच्या आधारे, बोरिवली पोलिसांनी रहाटेला चौकशीसाठी बोलावले आणि त्याच्याविरुद्ध पोक्सो कायदा आणि भारतीय दंड संहिता (BNS) च्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याला अटक करण्यात आली.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *