मोठी बातमी! सोन्याच्या दरात 24 तासात तब्बल 1400 रुपयांनी वाढ

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

सोन्याच्या दराने पुन्हा उसळी घेतली आहे. जळगावातील जगप्रसिद्ध सराफ बाजारात सोन्याच्या दराने विक्रमी उच्चाक घेतला आहे. सोन्याच्या दरात 24 तासात तब्बल 1400 रुपयांनी वाढ झाली असून पहिल्यांदाच सोने विना जीएसटी १ लाखांवर पोहोचले आहे. त्यामुळे सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांना फायदा झाला आहे. जळगावच्या सराफ बाजाराच्या इतिहासात पहिल्यांदाच सोन्याचे दर जीएसटीसह १ लाख ३ हजार रुपयांवर पोहोचले आहेत. शेअर बाजारात मंदी असल्याने सोन्याच्या गुंतवणकीकडे वळलेल्यांना याचा फायदा होणार आहे.

जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दराने आज विक्रमी उच्चांकी गाठली आहे. सोन्याच्या दरात 24 तासात तब्बल 1400 रुपयांनी वाढ झाली असून पहिल्यांदाच सोने विना जीएसटी १ लाखांवर पोहोचले आहे. जळगावच्या सराफ बाजाराच्या इतिहासात पहिल्यांदाच सोन्याचे दर विना जीएसटी १ लाख ३ हजार रुपयांवर पोहोचले आहे.त्यामुळे या दरवाढी काहींना आनंद झाला आहे.सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांना अर्थात आनंद झाला आहे. परंतू सणासुदीच्या तोंडावर सोने खरेदी करणाऱ्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे.

चांदीचा सुद्धा विक्रमी उच्चांक
सोन्याचे भाव गगनाला भिडले असतानाच चांदीचे दराने सुद्धा विक्रमी उच्चांकी गाठली आहे. आता इतिहासात पहिल्यांदाच चांदीचे दर जीएसटी सह १ लाख १८ हजार ४५० रुपयांवर पोहोचले आहेत. सोन्याच्या वाढत्या दरामुळे काही महिन्यांपूर्वी तुलनेने स्वस्त दरात सोने खरेदी केलेल्या गुंतवणूकदारांसाठी ही मोठी संधी मानली जात आहे. सोन्या आणि चांदीच्या दराचा ग्राहकांवर मोठा परिणाम झाला असून ग्राहकांमध्ये वाढत्या दरामुळे ‘कही खुशी कही गम’ असे चित्र पाहायला मिळत आहे.

जागतिक अस्थिरतेचा परिणाम
सर्व देशांवर नव्याने जे टेरीफ रेट लागू झाले आहेत. त्यामुळे जगातील काही देशांमध्ये निर्माण झालेल्या अस्थिरतेचा देखील सोन्या- चांदीच्या दरावर परिणाम झाल्याचे सराफ व्यावसायिक यांचे म्हणणे आहे. सोन्याचे दर गगनाला भिडल्यामुळे सोन्या आणि चांदीच्या खरेदीपेक्षा दागिन्यांची मोड करण्याकडे ग्राहकांचा कल असल्याचे सराफ व्यावसायिक यांचे म्हणणे आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *