पावसाळ्यात पाठदुखी आणि स्नायुंमधील कडकपणा वाढ वाढतोय,करा ‘हे’ उपाय

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

पावसाळा हा जरी उष्णतेपासून आराम देत असला, तरी बदलत्या वातरणामुळे हवेचा दाब वाढून पाठदुखी आणि स्नायुंमधील कडकपणा वाढ शकतो. पाठदुखी आणि हवामानातील बदल यांचा परस्परसंबंध या लेखाच्या माध्यमातून सांगण्यात आला आहे. लक्षात ठेवा, हवामानातील बदल तुमच्या मणक्यावर परिणाम करू शकतात. वरिष्ठ ऑर्थोपेडिक आणि स्पाइन सर्जन डॉ. धीरज सोनवणे यांनी वेदनामुक्त आयुष्य जगण्यासाठी याठिकाणी काही टिप्स दिल्या आहेत.

पावसाळ्यातील बदलत्या वातावरणामुळे पाठदुखी आणि सांधे कडक होणे यासारख्या तक्रारींमध्येही वाढ होते. अनेक लोकांना असे लक्षात येते की पावसाळ्याच्या दिवसात, विशेषतः पहाटे किंवा रात्रीच्या वेळी पाठदुखीची तीव्रता वाढते. नको असलेल्या पाठदुखीमुळे दैनंदिन दिनचर्येवरही त्याचा परिणाम होतो . हे सर्वांनाच माहित आहे की पावसाळ्यात आर्द्रता वाढून वातावरणाचा दाब कमी होतो आणि मणक्यासंबंधी तक्रारी डोकं वर काढू लागतात. पाठीच्या समस्या, दुखापती, संधिवात किंवा बैठी जीवनशैलीचा इतिहास असलेल्यांनी विशेष सावधगिरी बाळगली पाहिजे.

हवेतील आर्द्रतेचा तुमच्या मणक्यावर कसा परिणाम होतो?
हवेतील आर्द्रतेमुळे शरीरातील स्नायू आणि अस्थिबंधनांसह मऊ ऊतींना सुज येते. यामुळे पाठीचा कणा आणि पाठीच्या खालच्या भागात कडकपणा येऊन हलचाली मंदावू शकतात. स्लिप डिस्क, सायटिका किंवा ऑस्टियोआर्थरायटिस सारख्या पाठीच्या आजार असलेल्या लोकांना पावसाळ्यात वातावरणातील दाबात बदल झाल्याने तसेच स्नायू ताठरणाऱ्या थंड हवामानामुळे तीव्र वेदना होऊ शकतात ज्यामुळे पाठदुखीचा त्रास होतो. त्याचप्रमाणे जी लोकं शारीरिकदृष्ट्या कमी सक्रिय असतात आणि घरात जास्त वेळ घालवतात त्यांना याचा त्रास अधित जाणवतो. जास्त वेळ बसणे, घरून काम करताना चुकीची शारीरीक स्थिती बाळगणे आणि स्ट्रेचिंग किंवा हालचाल न करणे यामुळे पाठीचा कणा आणि पाठीच्या खालच्या भागात ताण येतो, ज्यामुळे वेदना आणि गतिहीनता निर्माण होते. दमट वातावरण आणि निसरडे रस्ते यामुळे पडणे किंवा पाठीला दुखापत होण्याचा धोका देखील वाढतो.

पावसाळ्यात तुमच्या पाठीचे संरक्षण करण्यासाठी या टिप्सचे पालन करा
पाठीचा कणा लवचिक ठेवण्यासाठी दररोज व्यायाम करा, स्ट्रेचिंग करा आणि चालायला विसरु नका. तुमची पाठ सरळ आणि खांदे आरामदायी स्थितीत ठेवून बसण्याची योग्य पध्दत वापरा. योग्य शारीरीक स्थिती राखण्याची खात्री करा. जास्त वेळ काम करत असल्यास पाठीला योग्य आधार देणारी खुर्ची वापरा. स्नायुंचा कडकपणा आणि वेदना कमी करण्यासाठी दुखणाऱ्या जागी हीटिंग पॅड किंवा हॅाट कॉम्प्रेस वापरा. थंड किंवा ओल्या हवामानात वावरताना, उठताना, वाकताना किंवा एखादी जड वस्तू उचलताना काळजी घ्या. पावसाळ्यात पाठदुखी टाळण्यासाठी वरिल टिप्स नक्की फॉलो करा.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *