भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानवर केलेला एअर स्ट्राईकमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्राने दाणादाण उडविली होती. या ध्वनीच्या वेगापेक्षा जास्त वेग असलेल्या या सुपरसॉनिक मिसाईलची आता जगात तारीफ होत आहे.एकीकडे १५ देशांनी या मिसाईलच्या खरेदी साठी उत्सुकता दाखवली आहे. तर चीनी मीडियांनी ब्रह्मोसचे कौतूक केल्याचे उघड झाले आहे. चीनच्या साऊथ चायना मॉर्गिंग पोस्टने या मिसाईलला खूपच धोकादायक मिसाईल असे म्हटले आहे.
रशिया आणि भारत यांच्या सहकार्यातून बनलेल्या ब्रह्मोस मिसाईलने पाकिस्थानची ऑपरेशन सिंदूरच्यावेळी हालत खराब केली. त्यास पाकिस्तानच्या एअर डिफेन्स सिस्टीम रोखू शकली नाही. या ब्रह्मोस क्षेपणास्राने जगात भारताचे नाव केले आहे. पंधरा देशाने या क्षेपणास्राचं कौतूक केले आहे. चीन आणि अमेरिकेच्या कट्टर दुश्मनांनी या क्षेपणास्रांना खरेदी करण्याची तयारी दाखविली आहे. फिलिपाईन्स, व्हीएतनाम आणि इंडोनेशिया या देशांनी ब्रह्मोस खरेदी करण्याची इच्छा प्रदर्शित केली आहे.
ब्रह्मोसवर या 15 देशांची नजर
भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अलिकडेच सांगितले होते की १४ ते १५ देश ब्रह्मोस खरेदी करु इच्छित आहेते. द न्यू इंडियन एक्सप्रेसनी संरक्षण खात्यातील सूत्रांच्या हवाल्याने या देशांची नावे जाहीर केली आहेतत. यात थायलंड, फिलीफाईन्स, इंडोनेशिया, व्हीएतनाम, सिंगापुर, ब्रुनेईस, इजिप्त, सौदी अरब,संयुक्त अरब अमिराती, कतार, ओमान, ब्राझील, चिली, अर्जेंटीना आणि व्हेनेझुएला या देशांचा समावेश आहे.
यात फिलीपाईन्स पहिला देश आहे, ज्याने ब्रह्मोस खरेदी करण्याची इच्छा दर्शविली आहे. फिलीपाईन्सने साल २०२२ मध्ये भारतासोबत ३७५ दशलक्ष अमेरिकन डॉलरचा करार केला होता. व्हीएतनाम आणि इंडोनेशिया कथितपणे अनुक्रमे ७०० दशलक्ष अमेरिकन डॉलर आणि ४५० दशलक्ष अमेरिकन डॉलरच्या करारावर चर्चा केली आहे.
अमेरिका आणि चीनचे शत्रू खरेदी करणार
फिलिपाईन्सचा शत्रू चीन आहे. तसेच ब्राझील आणि व्हेनेझुएला सारखे देश थेट अमेरिकेच्या विरोधात आहेत. सौदी, युएई,कतार आणि ओमान मध्य पूर्वेत आपला जोर वाढवण्यासाठी एकत्र आले आहेत. मध्य पूर्वमध्ये सध्या शस्रास्रांच्या बाबतील तुर्कीए, इराण आणि इस्राईल खूपच पुढे गेले आहेत. तुर्कीए आणि इराण मुस्लीम बहुल देश आहेत,तर इस्राईल ज्यू बहुल देश आहे.
ब्रह्मोसमध्ये काय विशेष ?
ब्रह्मोस क्षेपणास्रला रशिया आणि भारताने मिळून तयार केले आहे.याचे नाव भारताची नदी ब्रह्मपुत्र आणि रशियाची मस्कोवा नदीचे नावावर ठेवले आहे. या मिसाईलचा वेग Mach 2.8 ते 3.0 पट आहे. या मिसाईल स्वत:सोबत तीन टनापर्यंत वॉरहेड घेऊन जाऊ शकते. या मिसाईलला हवेतून, जमीनवरुन आणि समुद्राहून अशा तिन्हीही ठिकाणांहून लाँच केले जाऊ शकते.
कमी उंचीवरुनही उडते
खास बाब म्हणजे हे मिसाईल कमी उंचीवरुनही उडू शकते. तसेच याचा माग रडारला लावता येत नाही. याच्या नव्या व्हर्जनची रेंजर ४५० ते ८०० किमीपर्यंत आहे.या मिसाईलची किंमत ३४ कोटी रुपये आहे.ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने या मिसाईलद्वारे पाकिस्तानातील ९ अतिरेकी ठिकाणांना लक्ष्य केले होते. या मिसाईलचा हल्ला इतका अचूक होता की पाकिस्तानचे सर्व अतिरेकी प्रशिक्षण स्थळ नष्ट झाले.