आजचे राशीभविष्य 12 August 2024 : (लेखणी बुलंद टीम )
मेष : आज कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल. त्यामुळे तुम्हाला खूप आनंद होईल. व्यापारी वर्गासाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. तुमचा व्यवसाय पुढे कसा नेता येईल. याचा सतत तुम्ही विचार कराल. तुमच्या कुटुंबात आज आनंदाचं वातावरण असेल. कुटुंबासाठी काहीतरी करण्याचा विचार तुमच्या मनात येईल. आज तुम्हाला डोळ्यांचा त्रास जाणवेल. त्यामुळे तुम्ही तुमचा स्क्रिन टाईम कमी करावा.
वृषभ : आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी खूप ताण असेल. त्यामुळे तुम्हाला मानसिक थकवा जाणवेल.आज तुम्हाला मानसिक ताण जाणवेल. त्यामुळे वेळेनुसार आराम करा. आज तुमची व्यवसायातील आर्थिक स्थिती आधीपेक्षा फार चांगली असणार आहे. काम करण्यास उत्साह असेल.तरूणांनी मेहनत करत राहणं गरजेचं आहे. एक ना एक दिवस यश नक्की तुम्हाला मिळेल.
मिथुन : आज ऑफिसमध्ये सगळे तुमच्या कामाचं कौतुक करतील. तुम्हाला प्रोत्साहन, मार्गदर्शन देतील. तसेच, नवीन कामाची जबाबदारी तुमच्यावर सोपविण्यात येईल. तुमचं आरोग्य सामान्य असणार आहे. फक्त कोणत्याच प्रकारचा तणाव घेऊ नका. मानसिक शांतता राखा.आज महिला व्यापाऱ्यांनी आपल्या कामात सावध राहणं गरजेचं आहे. कोणीही तुमचा गैरफायदा घेऊ शकतं. मित्रांच्या सहकार्याने आज तुमची अनेक कामं सहज साध्य करता येईल. मित्रांचं ऋण तुम्ही आयुष्यभर फेडाल.
कर्क : कामाच्या ठिकाणी तुमचं चांगलं काम पाहून तुमचा बॉस तुमच्यावर खुश होईल. तसेच, नवीन प्रोजक्ट देखील तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे.आज तुमच्या हाता-पायांना सूज येऊ शकते. त्यामुळे तुम्ही खूप चिंतेत असाल. जर तुम्ही शेअर मार्केटशी संबंधित व्यवसाय करत असाल तर आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असणार आहे.आज कुटुंबियांबरोबर तुम्ही कुठेतरी बाहेर फिरायला जाल. तसेच, अक्षय्य तृतीयेनिमित्त नवीन वस्तूंची खरेदी कराल.
सिंह : आज तुम्ही स्वत:बरोबरच इतरांनाही चार गोष्टी चांगल्या शिकवाल. ज्ञान देणं हा चांगला गुण आहे जो तुमच्यात आहे.वाढत्या उन्हाळ्यामुळे आज तुम्हाला थोडासा अशक्तपणा जाणवू शकतो. अशा वेळी थोड्या थोड्या वेळाने लिंबू सरबत किंवा ग्लूकोसचं पाणी प्या.आज तुमचे तुमच्या सहकाऱ्यांबरोबर छोटे-मोठे वाद होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही हा वाद थांबविण्याचा प्रयत्न करा. आज तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर फिरायला जाल. हा काळ तुमच्यासाठी फार चांगला असेल.
कन्या : तुम्हाला तुमच्या नोकरीत बदल करण्याची शक्यता आहे. एकच काम करून तुम्हाला कंटाळा येईल. त्यामुळे नवीन नोकरीचा शोध घ्यायला सुरुवात करा. आज तुमचं मन एखाद्या विचारात फार अस्वस्थ असू शकतं. तुमच्या मनाला शांत करण्यासाठी धार्मिक ठिकाणाला भेट द्या. आज तुम्हाला कामासंबंधित नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळू शकतं. तसेच, तुमच्या पगारात देखील वाढ होऊ शकते. तरूणांनी आपल्या करिअरबाबत अधिक गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
तूळ : आज तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी काम करताना तुमच्या डोक्याचा खूप वापर करावा लागेल. तुमच्या बुद्धीने तुम्ही अनेक कामं पूर्ण कराल.व्यापारी वर्गाने आज कोणत्याही प्रकारचं कर्ज घेणं टाळावं, कारण ग्रहण बदलल्यामुळे तुमच्या जीवनात कर्जाबाबत अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.तुमच्या परीक्षा जवळ आल्या असतील तर तुम्ही परीक्षेची तयारी अधिक जोमाने करायला हवी.दमा आणि खोकल्याचा त्रास असलेल्यांना आणखी समस्यांना सामोरं जावं लागू शकतं, म्हणूनच तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत थोडं सतर्क राहिलं पाहिजे.
वृश्चिक : सॉफ्टवेअर इंजिनीअरिंग करणाऱ्या लोकांवर आज कामाचा ताण खूप वाढू शकतो, तो चांगल्या प्रकारे सांभाळणं तुमच्यासाठी एक आव्हान असेल. बाकीच्यांना ऑफिसमध्ये प्रगतीच्या चांगल्या संधी मिळू शकतात.इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे व्यापारी आज चांगली सूट देऊन ग्राहकांना आकर्षित करू शकतात. ग्राहकांची संख्या वाढवणं अत्यंत गरजेचं आहे, तरच तुमचा व्यवसाय चांगला चालेल. आज त्यांना काही समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. पण तुम्ही तुमच्या बुद्धीने या समस्यांवर सहजतेने मात कराल, आज तुमचा पैसा कोणत्या ना कोणत्या मार्गाने खूप खर्च होऊ शकतो.आजार किरकोळ असो किंवा मोठा आजार, तुम्ही तुमच्या तब्येतीबद्दल बेफिकीर न राहिल्यास बरं होईल. किरकोळ समस्या आल्यास डॉक्टरांशी संपर्क साधा.
धनु : आज तुम्हाला ऑफिसला जाण्याचा फायदा मिळू शकतो. तसेच, तुमच्या वरिष्ठांशी तुमचे संबंध अधिक घट्ट होतील, ते तुमच्यावर खूश असतील आणि तुमचा पगार वाढवतील. प्रॉपर्टी डीलिंगचा व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा काळ चांगला असेल. आज तुम्ही जी कोणती डील कराल त्यात तुम्हाला नक्कीच चांगला नफा मिळू शकेल, ज्यामुळे तुमचं मन खूप आनंदी होईल.तुम्ही अभ्यासात जास्त लक्ष दिलं पाहिजे, अन्यथा तुम्हाला परीक्षेत कमी गुण मिळतील आणि आईवडिलांकडून तुम्हाला फटकारलं जाऊ शकतं.आज तुमच्या तब्येतीची थोडी काळजी घ्या. पोटदुखी किंवा खोकल्याची समस्या तुम्हाला खूप त्रास देऊ शकते, त्यामुळे अगदी क्षुल्लक समस्या असतानाही निष्काळजीपणा करू नका.
मकर : आज ऑफिसचं काम करताना घाई करू नका, कारण घाईत केलेलं काम बिघडू शकतं आणि त्यामुळे तुमचे वरिष्ठ अधिकारी तुमच्याशी भांडू शकतात.आज व्यवसायासाठी तुमचं नशीब चांगलं आहे, तुम्हाला चांगला नफा मिळेल. तुम्ही जे काही काम हाती घ्याल त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल.आज तुम्ही कोणत्याही अज्ञात व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवू नये, अन्यथा तो तुमचा विश्वासघातही करू शकतो.तुमचं वजन खूप वाढत असेल तर ते कमी करण्यासाठी तुम्ही मॉर्निंग वॉक करा आणि तुमची जीवनशैली सुधारण्यासाठी योगा करून पाहिल्यास चांगलं होईल.
कुंभ : आज टेक्नोलॉजीचा वापर करुन ऑफिसचं काम पूर्ण करा, असं केल्याने तुमच्या कामाचा दर्जा सुधारेल. आज वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील, ज्यामुळे तुमचं मन आनंदी होईल.व्यावसायिकांना व्यवसायात काही चांगल्या संधी मिळू शकतात. व्यावसायिकाला चांगला नफा मिळण्याची दाट शक्यता आहे. आज तुमच्याशी नवीन ग्राहक जोडले जातील.विद्यार्थ्यांनी आज शिक्षकांचा सल्ला घ्यावा. त्यांना काहीतरी नवीन शिकायला मिळेल, जे त्यांच्या भविष्यात उपयोगी पडेल.आज तुमचं आरोग्य सामान्य असेल. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवणार नाही. आज तुम्हाला जुन्या आजारांपासून आराम मिळेल.
मीन : आज तुमचे ज्युनिअर आणि सिनीअर तुम्हाला कामात मदत करतील, आज तुमचं मन कामात गुंतलेलं असेल.जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर तुम्ही आधी चर्चा करा आणि मगच नवीन प्रोजेक्टमध्ये पैसे गुंतवा, कारण तुमचा पार्टनर तुम्हाला पुढे फसवू शकतो. हा निर्णय तुमच्या व्यवसायासाठी चांगला असेल.विद्यार्थ्यांनी आज त्यांच्या अभ्यासाकडे अधिक लक्ष द्यावं, आज तुम्ही तुमचा शाळेचा गृहपाठ पूर्ण करा, अन्यथा तुम्हाला तुमच्या शिक्षकांकडून ओरडा पडेल.तुमचं शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी तुम्ही नियमित योगासनं आणि ध्यानधारणा करावी आणि तसेच सकाळी गवतावर अनवाणी चालावं, तरच तुमचं शरीर निरोगी होऊ शकते.