Alert : 31 जुलैपर्यंत ITR फाइल करा, नाही तर कायमचं हे होणार नुकसान

Spread the love

इन्कम टॅक्स रिटर्न फाइल भरण्याचा काऊंटडाऊन सुरू झाला आहे. अवघ्या एक  दिवसांची मुदत उरली आहे. त्यानंतर सरकार इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी मुदत वाढवून देईल की नाही माहीत नाही. पण सरकारने मुदत वाढवून दिली नसेल आणि तुम्ही रिटर्न फाइल केली नसेल तर तुमचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. तशी माहितीच समोर आली आहे

आयकर विभागाने इन्कम टॅक्स रिटर्न करण्यासाठी 31 जुलै ही शेवटची तारीख दिली आहे. त्यानंतर दंड आकारण्याची तरतूद करण्यात आली आहे. पण आर्थिक दंडापेक्षा एक मोठा नियम आहे. त्यामुळे तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. जर तुम्ही 31 जुलैपर्यंत आयटीआर फाईल करत असाल तर तुमच्यासमोर दोन स्लॅबचे पर्याय दिले जातात. सध्या न्यू टॅक्स रिजीम बायडिफॉल्ट आहे. पण ज्या करदात्यांना ओल्ड टॅक्स रिजीमचा पर्याय निवडायचा असेल आणि डिडक्शनचा लाभ उठवायचा असेल तर ते ओल्ड टॅक्स रिजीम निवडू शकतात. म्हणजे 31 जुलैपर्यंत तुम्ही ओल्ड टॅक्स रिजीममध्ये शिफ्ट होऊ शकता. पण तुम्ही तसे न केल्यास तुम्ही बायडिफॉल्ट न्यू टॅक्स रिजीममध्ये जाल.

31 जुलैनंतर हा पर्याय निघून जाईल. म्हणजे तुम्हाला कितीही वाटलं तरी तुम्ही ओल्ड टॅक्स रिजीमचा पर्याय निवडू शकणार नाहीत. त्यानंतर तुम्हाला दरवर्षी न्यू टॅक्स रिजीमचाच पर्याय निवडावा लागणार आहे. जर तुम्ही भाड्याने राहत असाल किंवा नव्या घराचे कर्ज फेडत असाल तर ओल्ड टॅक्स रिजीमचा फायदा घेऊन तुम्ही डिडक्शन वाचवू शकता. पण त्यासाठी तुम्हाला 31 जुलैपर्यंतच आयटीआर भरावा लागणार आहे. नियमानुसार 31 जुलैनंतर ओल्ड टॅक्स रिजीमचे पर्याय बंद होतील. त्यामुळे उरलेल्या लोकांना 2023-24साठी आयटीआर न्यू टॅक्स रिजीममध्येच भरावा लागणार आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *