मोठी बातमी! नवी मुंबईत उभारणार भारतातील पहिले ‘आंतरराष्ट्रीय शैक्षणिक केंद्र’

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

 

 

महाराष्ट्र सरकारच्या मार्गदर्शनाखाली सिडकोने स्थापन केलेल्या आंतरराष्ट्रीय शिक्षण संस्थेमुळे संपूर्ण भारतातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण घेण्याची संधी मिळेल.मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्राचे महायुती सरकार नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय शिक्षण शहर बांधण्याची तयारी करत आहे. राज्य सरकारच्या “मुंबई राइजिंग-क्रिएटिंग एन इंटरनॅशनल एज्युकेशन सिटी” या उपक्रमांतर्गत, पाच जगप्रसिद्ध परदेशी विद्यापीठांना मुंबई आणि नवी मुंबईत त्यांचे कॅम्पस स्थापन करण्यासाठी अधिकृतपणे लेटर ऑफ इंटेंट (LOI) दिले जाईल.

यामध्ये अ‍ॅबरडीन विद्यापीठ, यॉर्क विद्यापीठ, युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया, इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि इस्टिट्यूटो युरोपियो डी डिझाइन (IED) यांचा समावेश आहे. लेटर ऑफ इंटेंट (LOI) समारंभ शनिवारी १४ जून २०२५ दुपारी १२ वाजता मुंबईतील ताजमहाल पॅलेस हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आला. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे देखील या समारंभात उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार होता.

महाराष्ट्र सरकारच्या मार्गदर्शनाखाली सिडकोने स्थापन केलेल्या या आंतरराष्ट्रीय शिक्षण केंद्रामुळे भारतातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या शिक्षणाची संधी मिळेल. ज्यामुळे विविध संस्कृतींच्या देवाणघेवाणीला चालना मिळेल आणि विविध पार्श्वभूमीतील विद्यार्थी आणि प्राध्यापकांमध्ये सहकार्य आणि संवाद वाढेल. या उपक्रमाचा मुख्य उद्देश भारतात आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण प्रदान करणे आणि महाराष्ट्रात परदेशी विद्यापीठांचे कॅम्पस उभारणे आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *